वाशिम : नोटाबंदीनंतर जिल्ह्यात कॅशलेस धोरण अंगिकारण्याबाबत प्रशासकीय पातळीवरून बरेच प्रयत्न झाले. विविध स्वरूपातील कार्यशाळांच्या माध्यमातून यासंदर्भात जनजागृती देखील करण्यात आली. मात्र, बँकांनी गरजेच्या तुलनेत अद्यापपर्यंत फारच कमी प्रमाणात "पॉस मशीन" उपलब्ध करून दिल्याने जिल्ह्यात कॅशलेस धोरणाचा पुरता फज्जा उडाला आहे.८ नोव्हेंबर २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि हजारच्या नोटांवर बंदी लादली. सोबतच रोखीच्या व्यवहारांऐवजी कॅशलेस व्यवहारांना चालना देण्याकरिता प्रशासकीय पातळीवरून पुरेसे प्रयत्न व्हायला हवे, असे निर्देश दिले. त्यानुसार, जिल्हा प्रशासनाने प्रयत्नांची पराकाष्ठा करित याबाबत युद्धस्तरावर जनजागृती केली. परंतू जिल्ह्यातील बँकांनी हजारो ह्यस्वाईप मशीनह्णची गरज असताना आजपर्यंत केवळ ३६ मशीन उपलब्ध करून दिल्या. यामुळे प्रशासनाच्या प्रयत्नांवरही पाणी फेरल्या गेले आहे.
कॅशलेस धोरणाच्या अंमलबजावणीत बँकांचा "खोडा"!
By admin | Updated: April 11, 2017 20:07 IST