यात्रोत्सवानिमित्त बंजारा भजन स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 13:37 IST2019-01-16T13:37:01+5:302019-01-16T13:37:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शेलुबाजार : श्रीक्षेत्र चिखली येथील परमहंस महातपस्वी अवलीया संत झोलेबाबा यांच्या ५४ भव्य यात्रा महोत्सव निमित्त ...

यात्रोत्सवानिमित्त बंजारा भजन स्पर्धा
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलुबाजार : श्रीक्षेत्र चिखली येथील परमहंस महातपस्वी अवलीया संत झोलेबाबा यांच्या ५४ भव्य यात्रा महोत्सव निमित्त १८ जानेवारी रोजी नवीन व जुने बंजारा भजन स्पधेर्चे आयोजन करण्यात आले आहे. बंजारा भजन मंडळीनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन बंजारा भजन स्पर्धा प्रमुख माजी सहाय्यक पोलीस आयुक्त हिरा राठोड यांनी केले आहे.
मागील ४१ वषार्पासून संत दरबारी बंजारा भजन स्पधेर्चे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये नविन भजन मंडळाकरिता प्रथम बक्षीस स्व नंदुसिग नाईक यांच्या स्मृती प्रित्यर्थ हिरा राठोड यांचे कडून ११ हजार रुपये रोख तर व्दितीय बक्षीस ७ हजार व तिसरे बक्षीस ३ हजार रुपये देण्यात येणार आहे तसेच जुने बंजारा भजन स्पर्धेकरिता प्रथम बक्षीस २१२१ रुपये, व्दितीय ११११ रुपये तर तिसरे बक्षिस ७७७ रुपये देण्यात येणार आहे . या भजन स्पर्धत सहभागी झालेल्या व ज्यांना पारितोषिक मिळाले नाही अशा प्रत्येक मंडळाला १ हजार रुपये रोख मानधन म्हणून आयोजकाच्या वतीने देण्यात येणार आहे.