शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

बडनेरा-वाशिम रेल्वे मार्गाचा प्रस्ताव डिसेंबर महिन्यात सादर होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 12:27 PM

Badnera-Washim railway line News प्रस्ताव तयार असून डिसेंबर २०२० अखेरपर्यंत रेल्वे बोर्ड व रेल्वे मंत्रालय यांना सादर होणार आहे.

ठळक मुद्देरेल्वेने सन २०१६-१७ मध्ये या रेल्वे मार्गाच्या सर्व्हेक्षणाचे काम हाती घेतले होते. आता सर्वेक्षण पुर्ण होवून प्रस्ताव तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे.

 लाेकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : दीर्घकाळापासून प्रतिक्षेत असलेल्या बडनेरा - वाशिम रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पुर्ण झाले आहे. या सर्वेक्षणानुसार या रेल्वे मागार्चा प्रस्ताव तयार करण्यात आला असून डिसेंबर २०२० अखेरपर्यंत रेल्वे बोर्ड व रेल्वे मंत्रालय यांना सादर होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वे नागपूर मंडळ समितीचे अध्यक्ष पद्श्री खासदार डॉ. विकास महात्मे यांनी नरखेड-बडनेरा-वाशिम रेल्वेमार्ग विस्तार कृती समितीच्या पदाधिकाºयांसोबत डॉ. दीपक ढोके यांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीत दिली.खासदार डॉ. विकास महात्मे हे शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दरम्यान त्यांनी वाशिम येथे नरखेड-बडनेरा-वाशिम रेल्वेमार्ग विस्तार कृती समिती  वाशिम पदाधिकारी डॉ दीपक ढोके, नगरसेवक बाळूभाऊ मुरकुटे यांच्यासह पदाधिकाºयांशी संवाद साधला. डॉ महात्मे म्हणाले,  वाशिम जिल्ह्याच्या विकासासाठी उद्योगधंदे उभारल्या शिवाय पर्याय नाही. जिल्ह्याचा उद्योगाच्या माध्यमातून विकास व्हावा या करिता शासनाने जिल्ह्यात जवळपास ३०० हेक्टर जमीन एमआयडीसीसाठी संपादित केली; परंतु उद्योगासाठी आवश्यक दळणवळणाची सुविधा नसल्यामुळे अपेक्षित उद्योग सुरु होवू शकले नाहीत. त्यासाठी हा रेल्वे मार्ग होणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने सन २०१५ मध्ये मागासलेल्या व अविकसीत जिल्ह्याचा विकास करण्याचे धोरण निश्चीत केले आहे. रेल्वेने सन २०१६-१७ मध्ये या रेल्वे मार्गाच्या सर्व्हेक्षणाचे काम हाती घेतले होते. आता सर्वेक्षण पुर्ण होवून प्रस्ताव तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. हा प्रस्ताव लवकरच रेल्वे बोर्ड व रेल्वे मंत्रालय यांना सादर होणार आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी या रेल्वे मागार्ची मागणी शासनाकडे सातत्याने लावून धरावी, असे आवाहन देखील डॉ. महात्मे यांनी केले. यावेळी कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष सचिन कुळकर्णी, हरीश खुजे, डिगांबर खोरणे, प्रणव बोलवार, धीरज शर्मा, वैभव रणखांब यांच्यासह इतर पदाधिकारी होते.

टॅग्स :washimवाशिमIndian Railwayभारतीय रेल्वे