निर्बंध असलीतानाही मानोरा तालुक्यात कृषी सहायकांच्या बदचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:28 IST2021-07-10T04:28:24+5:302021-07-10T04:28:24+5:30
तालुक्यातील बळीराजाला कृषी विभागातील शासकीय योजनांची माहिती देणे आणि शेती सुजलाम-सुफलाम होण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याचे काम ...

निर्बंध असलीतानाही मानोरा तालुक्यात कृषी सहायकांच्या बदचा घाट
तालुक्यातील बळीराजाला कृषी विभागातील शासकीय योजनांची माहिती देणे आणि शेती सुजलाम-सुफलाम होण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याचे काम कृषी सहायकांना असते. नेमून दिलेल्या गावाला संबंधित कर्मचारी फार कमी फिरकतात. परंतु, ज्या गावासाठी कर्तव्यावर नेमणूक झाली आहे. त्या गावाला वर्षानुवर्षे चिकटून बसलेले असल्याची चर्चा तालुक्यातील शेतकरी वर्गात जोर धरीत आहे. विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय अमरावतीचा गाडा सध्या प्रभारीच्या खांद्यावर असून महामारीच्या कारणामुळे तालुक्यात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेले व बदलीस पात्र कृषी सहायकांची बदली शासकीय निर्बंधांमुळे इतर तालुक्यात करता येत नसल्याने तालुक्यांतर्गतच बदल्या करण्यात येत असल्याची चर्चा तालुक्यात होत आहे आणि कर्मचाऱ्यांना आहे त्याच तालुक्यात ठेवण्यासाठी मोठा घोडा बाजारही होत असल्याची चर्चा तालुक्यात रंगत आहे.
----------------
तालुक्यात ४० पेक्षा अधिक कृषी सहायक
मानोरा तालुक्यात एकूण सात महसूल मंडळे असून या महसूल मंडळांतर्गत चाळीसच्या वर कृषी सहायकांची पदे अस्तित्वात आहेत. तालुका कृषी कार्यालयांतर्गत मागील पाच ते दहा वर्षांपासून अनेक कृषी सहायक कार्यरत असून सदरील कृषी सहायक बदलीस पात्र असूनही मागील वर्षीपासून सुरू झालेल्या महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने कर्मचारी बदलीप्रकरणी निर्बंधांचे धोरण आणलेले असल्याने कृषी सहायकांच्या बदलीवर बंधन आलेले आहे.