मायेच्या उबेतून जखमी वळूला मिळाले जीवदान

By Admin | Updated: August 25, 2014 01:56 IST2014-08-25T01:36:34+5:302014-08-25T01:56:19+5:30

एका विहिरीत कोसळलेल्या अंध वळूला गावकर्‍यांच्या मदतीने जीवनदान.

Bada got rid of the wounded bull from Ubai | मायेच्या उबेतून जखमी वळूला मिळाले जीवदान

मायेच्या उबेतून जखमी वळूला मिळाले जीवदान

साहेबराव राठोड / मंगरुळपीर
गावकुसातील एका विहिरीत कोसळलेल्या वळूला गावकर्‍यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. त्या जखमी वळूवर उपचार झाले. दोन्ही डोळ्य़ांनी अंध, चार शिंग असलेल्या त्या वळूला मोकाट सोडून देण्याचा सल्ला काहींनी दिला. मात्र गोसेवेचा वसा घेणार्‍या सतिष राठी यांनी या सर्व गोष्टीला नकार दिला. अन् चार महिण्याच्या अथक सेवेनंतर त्या वळूला २५ ऑगस्ट रोजी होणार्‍या पोळ्य़ाच्या तोरणाखाली नेण्याची तयारी राठींनी चालविली आहे.
कंझरा येथे पाच महिण्यापुर्वी गावपरिसरात वावरत असलेला एक वळु गावकुसातीलच एका विहीरीत अचानक कोसळला होता. त्यावेळी कंझरा येथील गावकर्‍यांच्या मदतीने त्याला विहीरी बाहेर काढले.
या चार शिंग व दोन्ही डोळय़ांनी अंध असलेल्या अनोख्या वळुला काही लोकांनी सोडुन देण्याचा आग्रह धरला. परंतु राठी यांनी या मागणीला नकार देत त्या वळूची राहण्याची व चार्‍याची व्यवस्था केली. त्यांच्या पुढाकारातून खाण्या पिण्याची व्यवस्था जागेवरच करण्यात आली आहे.
गोमातेची सेवा करणारे सतिष राठी भूमिहीन असुन त्यांनी वळु करिता चारा विकत घेतला आहे. वळुची दृष्टी परत यावी म्हणुनही त्यांनी भरपुर प्रयत्न केले. परंतु ते यशस्वी झाले नाही. गत चार महिण्यात वळूच्या जागेवरच झालेल्या सेवेमुळे त्याच्या तब्बेतीतही चांगलीच सुधारणा झाली आहे. त्याच बळावर सोमवार २५ ऑगस्टला असणार्‍या पोळ्य़ाला तोरणाखाली वळुला घेवुन जाण्याची तयारी सतिष राठी यांनी चालविली आहे.

Web Title: Bada got rid of the wounded bull from Ubai