शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

चिमुकल्यांची प्लास्टीक  पिशव्या न वापरण्याबाबत जनजागृती !        

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 12:26 IST

राष्ट्रीय हरितसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांच्या  मार्गदर्शनात व निसर्ग इकोक्लबच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्यांने जनजागृती केली .  

 वाशिम:   स्थानिक  एस एम सी इंग्लिश स्कूल वाशिमच्या राष्ट्रीय हरितसेनेच्या चिमुकल्यांनी  जागतिक हरित ग्राहकदिनी बाजारात फिरून प्लास्टिक पिशव्या न वापरण्याबाबत ग्राहकांसह दुकानदारांमध्ये जनजागृती केली यावेळी  विद्यार्थ्यांनी आपल्या गोड आवाजात प्लॉस्टिकमुळे होणार्या हानीबाबत प्राचार्य मीना उबगडे व राष्ट्रीय हरितसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांच्या  मार्गदर्शनात व निसर्ग इकोक्लबच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्यांने जनजागृती केली .     २८ सप्टेंबर हा दिवस जागतिक हरित ग्राहक दिन म्हणुन संबोधला जातो . हरितग्राहक ही संकल्पना पाश्चिमात्य देशात रूढ झाली असली तरी भारतामध्ये ती नविन नाही . गेल्या काहि वर्षांमध्ये ग्राहकवादाची वाढ झपाट्याने झाली आहे . गरजेचा विचार न करता केली जाणारी खरेदी अशी ग्राहकवादाची सोपी व्याख्या करता येईल. शॉपींगला जाने हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. वाढत्या ग्राहकवादामुळे आपल्याला बर्याच  समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्याचा विचार होने गरजेचे आहे .वाढता घनकचरा  व त्याचे व्यवस्थापन ,उत्पादन प्रक्रियेतुन होणारे प्रदूषण  यावर मार्गदर्शन करीत राष्ट्रीय हरितसेनेच्या वतीने वाशिम शहरात कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले .              ग्राहकांनी प्लास्टीकच्या  पिशव्यांचा वापर न करता कापडी पिशव्यांचा वापर करण्याचा आग्रह करण्यात आला  . या चिमुकल्यांच्या आवाहानाने शहरातील चौक गजबजुन गेला होता . हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय हरितसेनेचे चिमुकले गौरव भाकरे , ओम बोरकर, प्रसन्नजीत कांबळे , प्रियंका शिरसाठ , मेघना शर्मा , आचल गायकवाड , दिशा दायमा , ऋतुजा पंडित ,  विशाल वानखेडे , ऋचा हिवरकर , सुमीत चोंडकर, शुभम मोहळे , जान्वी वानरे, सर्वज्ञ आरू , अनुष्का कावरखे , ओम नागुलकर , रेणुका जांगीड , विवेक बोरकर, प्रणय राठोड ,वैष्णवी ईढोळे ,साहिल राउत ,हरिश तोतला  यांनी अथक परिश्रम घेतले .कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय हरितसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाStudentविद्यार्थी