मेळाव्यातून राज्य निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 14:31 IST2018-09-08T14:30:54+5:302018-09-08T14:31:07+5:30
वाशिम - राज्य निवृत्ती वेतनधारकांच्या समस्यांच्या निपटारा करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा कोषागार कार्यालयाने वाशिम येथे २४ सप्टेंबर रोजी मेळाव्याचे आयोजन केले आहे.

मेळाव्यातून राज्य निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - राज्य निवृत्ती वेतनधारकांच्या समस्यांच्या निपटारा करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा कोषागार कार्यालयाने वाशिम येथे २४ सप्टेंबर रोजी मेळाव्याचे आयोजन केले आहे.
राज्य शासन सेवेतून निवृत्त झाल्यानंतर निवृत्ती वेतनासंदर्भात अनेक समस्या भेडसावतात. कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनादेखील विविध समस्या भेडसावत. या समस्या निकाली काढण्यासाठी वृद्धापकाळातही संबंधित सेवानिवृत्तधारकांना तालुका तसेच जिल्हास्तरावरील कोषागार अधिकारी कार्यालयात चकरा माराव्या लागतात. काही वेळेला संबंधित कर्मचारी, अधिकाºयांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या पदरी निराशा पडते. राज्य निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या समस्या, अडीअडचणी तातडीने निकाली काढण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयाने २४ सप्टेंबरला वाशिम येथे मेळावा आयोजित केला आहे. ज्या निवृत्ती वेतनधारकांच्या अडीअडचणी असतील, त्यांना आवश्यक कागदपत्रांसह या मेळाव्यास उपस्थित राहता येणार आहे. आवश्यक कागदपत्रांसह सेवानिवृत्तधारकाने आपल्या समस्या मांडल्या तर या मेळाव्याच्या माध्यमातून प्रश्न निकाली निघू शकेल. सेवानिवृत्तधारकांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी सी.एस. खारोडे यांनी केले.