‘एटीएम’ फोडून १५ लाख पळविले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:22 IST2017-08-18T01:21:35+5:302017-08-18T01:22:49+5:30

‘एटीएम’ फोडून १५ लाख पळविले!
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर: तालुक्यातील शिवणी रोड येथील स्टेट बँक ऑफ इंडियाची एटीएम फोडून जवळपास १५ लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १६ व १७ ऑगस्टच्या मध्यरात्री घडली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, वाशिम-कारंजा मार्गावरील ग्राम शिवणी रोड येथे भारतीय स्टेट बँकेची शाखा असून, ग्रामपंचायत कार्यालयानजिक सदर शाखेची एटीएम कार्यान्वित आहे. १६ व १७ ऑगस्टला मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मशीन फोडून त्यामध्ये असलेली जवळपास १५ लाख रुपयांची रोकड लंपास केली. सदर प्रकार १७ ऑगस्टच्या सकाळी गावकर्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती मंगरुळपीर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलिसांचा धाक मावळला!
मंगरूळपीर तालुक्यात रोड रॉबरीच्या घटना घडल्यानंतर आता एटीएम फोडण्याचा प्रकारही घडला. यावरून पोलिसांचा धाक बहुतांशी मावळल्याचे सिद्ध होत आहे.
-