मंगरूळपीर तालुक्यात उत्साहात गणरायाचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:42 IST2021-09-11T04:42:33+5:302021-09-11T04:42:33+5:30
मंगरूळपीर : शहरासह तालुक्यात शुक्रवार १० सप्टेंबर रोजी उत्साहात गणरायाचे आगमन झाले. यावेळी गणेश भक्तांनी भक्तिमय वातावरणात गणेशमूर्तीची स्थापना ...

मंगरूळपीर तालुक्यात उत्साहात गणरायाचे आगमन
मंगरूळपीर : शहरासह तालुक्यात शुक्रवार १० सप्टेंबर रोजी उत्साहात गणरायाचे आगमन झाले. यावेळी गणेश भक्तांनी भक्तिमय वातावरणात गणेशमूर्तीची स्थापना केली.
गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणेश मंडळांना शासनाने अतिशय जाचक अटी घालून दिल्या होत्या. यावर्षी मात्र यात थोडी शिथिलता आहे. त्यामुळे तालुक्यात विविध ठिकाणी मंडळांनी गणेशाची मूर्ती स्थापन केली, तर घरोघरी सुद्धा नागरिकांनी बाप्पांची स्थापना केली आहे. यामुळे भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली असून, नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, शासनाने सार्वजनिक गणेश मंडळांना ४ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तीची स्थापना न करण्याचे निर्देश दिल्याने मूर्तिकारांनी चार फुटांपेक्षा कमीच उंचीच्या मूर्तीच तयार केल्याचे दिसले. कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याने निर्बंध शिथिल असले तरी गणेशमूर्तीच्या खरेदीसाठी शहरात फारशी गर्दी दिसून आली नाही.
००००००००००००००००००००
तालुक्यात ५७ गणेश मंडळांकडून स्थापना
कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर यंदाही गणेशोत्सवावर काही मर्यादा कायम आहेत. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या घटली असून, मंगरूळपीर तालुक्यात एकूण ५७ गणेश मंडळाने गणेशाची स्थापना केली आहे. त्यात शहरातील १७, तर ग्रामीण भागांतील ४० गणेशोत्सव मंडळाचा समावेश आहे, ही माहिती पोलिसांनी दिली.
100921\img-20210910-wa0039.jpg
मंगरुळपीर तालुक्यात उत्साहात गणरायाचे आगमन
मंगरुळपीर ता १०/(ता प्र) शहरासह तालुक्यात ता १० रोजी उत्साहात गणरायाचे आगमन झाले. यावेळी गणेश भक्तांनी भक्तीमय वातावरणात गणेश मूर्ती ची स्थापना केली.
गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणेश मंडळांना शासनाने अतिशय जाचक अटी घालून दिल्या होत्या. यावर्षी मात्र यात थोडी शिथिलता आहे.त्यामुळे तालुक्यात विविध ठिकाणी मंडळांनी गणेशाची मूर्ती स्थापन केली. तर घरोघरी सुद्धा नागरिकांनी बाप्पाची स्थापना केली आहे. यामुळे भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली असून नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.