माजी सैनिक खून प्रकरणातील आरोपींना अटक
By Admin | Updated: July 24, 2014 23:10 IST2014-07-24T23:10:05+5:302014-07-24T23:10:05+5:30
पाच आरोपींना २४ जुलै रोजी पोलीसांनी अटक केली आहे.

माजी सैनिक खून प्रकरणातील आरोपींना अटक
मंगरूळपीर : तालुक्यातील शिवणी रोड येथे २0 जुलै रोजी ६0 वर्षीय माजी सैनिकाला चार चाकी वाहनाने धडक देऊन ठार केल्याप्रकरणी पोलीसांनी ८ जणांवर खूनाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील पाच आरोपींना २४ जुलै रोजी पोलीसांनी अटक केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २0 जुलै रोजी फिर्यादी कुसूमबाई तुळशीराम खडसे रा.पोटी या महिलेने मंगरुळपीर पोलिसात तक्रार दिली की, आरोपी रवींद्र बबन चव्हाण, नरेन्द्र चव्हाण, त्याचे दोन सख्खे भाऊ व तीन सावत्र भाऊ तसेच विजय चव्हाण यांच्यासोबत शेतीबाबत वाद असून २0 रोजी रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास शिवणी शेतशिवारात आरोपींनी बेकायदेशीर जमाव करुन फिर्यादीचा पती माजी सैनिक तुळशीराम खडसे यास स्कॉर्पिओ गाडीने ठोस मारून ठार मारले. तसेच फिर्यादीच्या भावास लोखंडी पाईपने मारहाण केली व जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरूद्ध कलम १४७, १४८, १४९, ३0२, ३२३ सह कलम ३१, १0 अँट्रासिटी अँक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. यातील आरोपी पसार झाले होते. या प्रकरणातील आरोपी नरेन्द्र चव्हाण, रवींद्र बबन चव्हाण, अमोल वच्हाण, संदीप चव्हाण, विजय ज्ञानदेव चव्हाण असे एकूण पाच आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय वाळके करीत आहे.