शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

गुरांमधील संसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमास मंजूरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 17:09 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय; तर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : एरव्ही दरवर्षी मे महिन्याच्या सुरूवातीला राबविल्या जाणाऱ्या गुरांमधील संसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमास कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर सुरू असलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे यंदा विलंब झाला. दरम्यान, शासनाने २ जून रोजी त्यास मंजूरी दिली असून, अंमलबजावणीसाठी राज्यासह जिल्हा आणि तालुकास्तरीय समिती गठित करण्यात आल्या आहेत.गुरांमधील संसर्गजन्य लाळ-खुरकुत आणि सांसर्गिक गर्भपात रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यातील गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या आणि वराहांना सहा महिन्याच्या अंतराने वर्षातून दोनवेळा तसेच ४ ते ८ महिने वयोगटातील गायींच्या कालवडी व म्हशींच्या पारड्यांना एकवेळा सांसर्गिक गर्भपात प्रतिबंधक लसीकरण केले जाते. त्यानुसार, २०१९-२० या वर्षातील कार्यक्रम ‘लॉकडाऊन’मुळे काहीअंशी लांबणीवर पडला. आता त्यास मंजूरी मिळाली असून अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय; तर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. त्यानुषंगाने नियोजन आखण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.गुरांमधील संसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमासंबंधीचे शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार, ३ जून रोजी यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाºयांची तातडीची बैठक घेऊन आवश्यक सूचना देण्यात आल्या. लाळ-खुरकुत आणि सांसर्गिक गर्भपात रोग नियंत्रणासाठी लागणाºया लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.- भुवनेश बोरकरसहायक उपायुक्त, जिल्हा पशूसंवर्धन विभाग, वाशिम

टॅग्स :washimवाशिम