शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा, मालेगाव नगर पंचायतीमध्ये प्रशासकांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 12:25 IST

Manora, Malegaon Nagar Panchayat मालेगाव व मानोरा नगर पंचायत येथे प्रशासक म्हणून अनुक्रमे वाशिम व कारंजा उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने मालेगाव व मानोरा नगर पंचायत येथे प्रशासक म्हणून अनुक्रमे वाशिम व कारंजा उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे या नगर पंचायतींना मुदतवाढ मिळण्याच्या चर्चेला बुधवारी पूर्णविराम मिळाला. मालेगाव व मानोरा नगर पंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह नगरसेवकांची पाच वर्षांची मुदत ७ फेब्रुवारीला संपली. कोरोना संसर्गामुळे तूर्तास निवडणुकीची कोणतीही घोषणा झालेली नाही. मालेगाव येथील सदोष प्रभाग रचना व आरक्षणामुळे नगर पंचायत निवडणूक प्रक्रियेला राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली. या स्थगितीमुळे नगर पंचायतीची निवडणूकही लांबणीवर पडणार आहे. नगर पंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह नगरसेवकांना मुदतवाढ मिळणार की प्रशासक म्हणून नियुक्ती होणार, यावर मालेगाव शहरात चर्चा रंगत होत्या. मानोरा नगर पंचायत येथेही चर्चा रंगली होती. अखेर नगर पंचायतीवर उपविभागीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्याने सर्व चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मालेगाव येथे वाशिमचे उपविभागीय अधिकारी तर मानोरा येथे कारंजाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी जारी केला आहे. 

१५ दिवसांनी अनौपचारिक बैठक घ्यावी !सद्यस्थितीत कोरोना संसर्गामुळे उद्भवलेली आरोग्यविषयक आपत्कालिन परिस्थिती, लोकांचा सहभाग विचारात घेता, संबंधित प्रशासकांनी व्यवस्थापनाच्या दृष्टीने अनौपचारिकरित्या शक्यतो नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, विषय समिती सभापती व गटनेते या पदाधिकाऱ्यांशी सल्लामसलत करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी पारित केलेल्या आदेशात म्हटले आहे. नगर पंचायतीचे कामकाज सुयोग्य व लोकाभिमुख व्हावे, या दृष्टीकोनातून मदत करण्यासाठी अनौपचारिक सल्लागार समिती असावी तसेच करण्यात येणाऱ्या उपाययोजना वेळोवेळी आवश्यकतेनुसार उपरोक्त पदाधिकाऱ्यांना अवगत कराव्यात. कोरोना नियंत्रणाच्या दृष्टीने संबंधित पदाधिकाऱ्यांकडून सूचना मिळण्याच्या दृष्टीने शक्यतो प्रत्येक १५ दिवसांनी संबंधित पदाधिकाऱ्यांची आॅनलाईन पद्धतीने अनौपचारिक बैठक घ्यावी, असेही आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा