अनुदानित कृषी औजारांसाठी १ जूनलाही स्विकारले जाणार अर्ज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 15:06 IST2018-05-31T15:06:37+5:302018-05-31T15:06:37+5:30
वाशिम : शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर विविध स्वरूपातील कृषि अवजारे, यंत्र वाटप केले जात असून पुर्वी अर्ज करण्याची अंतीम मुदत २८ मे होती. मात्र, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी त्यात ४ दिवस वाढ करण्यात आली.

अनुदानित कृषी औजारांसाठी १ जूनलाही स्विकारले जाणार अर्ज!
वाशिम : शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर विविध स्वरूपातील कृषि अवजारे, यंत्र वाटप केले जात असून पुर्वी अर्ज करण्याची अंतीम मुदत २८ मे होती. मात्र, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी त्यात ४ दिवस वाढ करण्यात आली. त्यानुसार, १ जून रोजी देखील अर्ज स्विकारले जाणार आहेत. शेतकऱ्यांनी या बदलाचा लाभ घेवून अर्ज करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले.
शेतकामासाठी मजूर मिळणे अशक्य झाले आहे. ही बाब लक्षात घेवून राज्यशासनातर्फे कृषि यांत्रिकीकरणास चालना दिली जात आहे. त्यानुषंगाने शेतकऱ्यांना मोठे ट्रॅक्टर, लहान ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटाव्हेटर, कल्टीव्हेटर, प्लांटर (खत व बियाणे टोकण यंत्र), मळणी यंत्र, पॉवर बिडर, रिपर, दालमिल व पूरक यंत्र, ट्रॅक्टरचलीत फवारणी यंत्र, मिस्ट ब्लोअर, सबसॉईलर आदी कृषि अवजारे घेण्याकरीता अनुदान दिले जाणार आहे. पात्र शेतकºयांनी कृषि विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिलेल्या अर्जाच्या नमुन्यात अटी व शर्तीच्या अधिन राहून १ जून २०१८ या शेवटच्या दिवसापर्यंत संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे आपले रितसर अर्ज सादर करणे आवश्यक आहे. जिल्ह्याला प्राप्त आर्थिक लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लाभार्थींची निवड तालुका हा घटक मानून सोडत पध्दतीने ८ जून २०१८ रोजी तालुकास्तरावर घेण्यात येईल, अशी माहिती कृषि विभागाच्या वतीने कळविण्यात आली.