नजर अंदाज आणेवारीबाबत जिल्हाधिका-यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 20:18 IST2017-09-12T20:18:19+5:302017-09-12T20:18:19+5:30
ब्रिटीश काळापासून सुरु असलेली प्रचलीत आणेवारी पध्दत बाजुला सारुन दुष्काळी परिस्थिती व त्यावर उपाय योजना करणे संदर्भात सन २०१५ -१६ मध्ये आपण केलेली चुक पुन्हा न करता सन २०१७ -१८ नजर अंदाज आणेवारी जाहीर करतांना काही महत्वाच्या बाबी विचारात घेवुन कार्यवाही करणे बाबत सुभाष उत्तमराव देवढे पाटील दुबळवेल यांनी जिल्हाधिकारी यांना ११ सप्टेंबर रोजी निवेदन सादर केले.

नजर अंदाज आणेवारीबाबत जिल्हाधिका-यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: ब्रिटीश काळापासून सुरु असलेली प्रचलीत आणेवारी पध्दत बाजुला सारुन दुष्काळी परिस्थिती व त्यावर उपाय योजना करणे संदर्भात सन २०१५ -१६ मध्ये आपण केलेली चुक पुन्हा न करता सन २०१७ -१८ नजर अंदाज आणेवारी जाहीर करतांना काही महत्वाच्या बाबी विचारात घेवुन कार्यवाही करणे बाबत सुभाष उत्तमराव देवढे पाटील दुबळवेल यांनी जिल्हाधिकारी यांना ११ सप्टेंबर रोजी निवेदन सादर केले.
देवढे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, सन २०१५ -१६ चे दुष्काळ पेक्षा मोठा दुष्काळ या वर्षी दिसून येत आहे. पिण्याचे पाणी मिळणार नाही या पेक्षा मोठी दुसरी वाईट गोष्ट काय असु शकते याचा विचार करा . वाशिम शहराची पिण्याची लहान भागविण्यासाठी जुमडा अडोळी येथीज पाणी घेवुन त्या शेतकºयावर अन्याय करण्यापेक्षा मराठवाड्यातील मोठमोठ्या धरणातील उपलब्ध असलेल्या धरणाचे वाहनारे पाणी आपल्या जिल्ह्यात नदीजोड प्रकल्पातुन व जलवाहण्यातुन आपल्या जिल्ह्यासाठी ते देवु शकतात ते घेण्यासाठी व विदर्भातील अकोला , वाशिम, यवतमाळ या जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तसा प्रस्ताव तयार करुन ना. गडकरी यांना पाठवावा, नियमाप्रमाणे १५ सप्टेंबर ही तारीख आणेवारी जाहीर करण्याची आहे. शेतकºयांचे मते जाणुन घ्या व जाहीर होणारी नजर अंदाज आणेवारी सत्यपरिस्थितीचा विचार करुन जाहीर करा व त्या प्रमाणे दुष्काळारावर मात करण्यासाठी सुरुवात करण्याचे नियोजन करा. म्हणुन या सर्व बाबीचा आपण प्रशासनाचे मुख्य घटक असल्यामुळे सहानुभूती पुर्वक गंभीर विचार करुन न्याय द्यावा अशी मागणी निवेदनातून देवढे यांनी केली आहे.