शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

‘वऱ्हाड दूध’साठी सर्वतोपरी सहकार्य करणार, 'मिल्क क्लस्टर' विकसीत करण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 2:52 PM

वाशिम : मुख्यमंत्री विशेष सहाय्यता निधीसाठी निवडण्यात आलेल्या जिल्ह्यातील भामदेवी या गावात लोकसहभागातून अत्यंत चांगले काम झाले आहे. दुधाळ जनावरांची वाढलेली संख्या आणि दुध प्रक्रिया केंद्राच्या उभारणीमुळे गावातील दुग्धव्यवसायाला चालना मिळाली. हा व्यवसाय अजून वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी लागणारे सहकार्य करण्यास आपण तयार आहोत, अशी ग्वाही अमरावती विभागीय आयुक्त पियुष ...

वाशिम : मुख्यमंत्री विशेष सहाय्यता निधीसाठी निवडण्यात आलेल्या जिल्ह्यातील भामदेवी या गावात लोकसहभागातून अत्यंत चांगले काम झाले आहे. दुधाळ जनावरांची वाढलेली संख्या आणि दुध प्रक्रिया केंद्राच्या उभारणीमुळे गावातील दुग्धव्यवसायाला चालना मिळाली. हा व्यवसाय अजून वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी लागणारे सहकार्य करण्यास आपण तयार आहोत, अशी ग्वाही अमरावती विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिली.आयुक्तांनी भामदेवीला शुक्रवारी भेट देऊन तेथील दुग्धोत्पादकांशी विविध विषयांवर चर्चा केली. अधिक उत्पादन मिळावे, याकरिता ‘मिल्क क्लस्टर’ विकसीत करण्याचे आवाहन करून पियूष सिंह पुढे म्हणाले, की इतर जिल्ह्यांमध्ये ‘मदर डेअरी’च्या माध्यमातून दुग्धव्यवसायाला चालना देण्यासाठी संकलन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. त्याच धर्तीवर वाशिम जिल्ह्यात दूध संकलनासाठी वऱ्हाड दूध उत्पादक संस्थेने प्रयत्न करावे. त्यासाठी ‘मिल्क क्लस्टर’ विकसित करावे. कृषि समृद्धी व इतर योजनांमधून वºहाड दूध उत्पादक संस्थेला आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमास आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, कारंजाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, कृषि समृद्धी प्रकल्पाचे व्यवस्थापक शर्मा, तहसीलदार सचिन पाटील, सरपंच सुभाष मोहकार, उपसरपंच देवचंद कांबळे, डॉ. निलेश हेडा यांच्यासह दूध उत्पादक संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.