‘अपनी मंडी अपना बाजार’ ही चांगली संकल्पना : पालकमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:23 IST2021-02-05T09:23:12+5:302021-02-05T09:23:12+5:30
रिसोड शहरामध्ये मेहकररोड स्थित अपनी मंडी अपना बाजार या दालनाचे उद्घाटन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते तर संत ...

‘अपनी मंडी अपना बाजार’ ही चांगली संकल्पना : पालकमंत्री
रिसोड शहरामध्ये मेहकररोड स्थित अपनी मंडी अपना बाजार या दालनाचे उद्घाटन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते तर संत अमरदास पतसंस्था संस्थापक अध्यक्ष उत्तमचंद बगडिया यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून खासदार भावनाताई गवळी, आमदार अमित झनक, आमदार ॲडव्होकेट किरणराव सरनाईक, आमदार संजय रायमुलकर , जिल्हाधिकारी श्णमुगराजन एस, उपजिल्हाधिकारी वाघमारे, मंगेश मोहिते ,जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे , जिल्हा कृषी अधिकारी शंकरराव तोटावार, तहसीलदार अजित शेलार, चक्रधर गोटे, स्वप्नील सरनाईक, बीज प्रमाणीकरण अधिकारी उन्हाळे यांची उपस्थिती होती . सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते मंडी या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. तदनंतर मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी. संचालक पंजाबराव अवचार यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले. पालकमंत्री म्हणाले शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून प्रोजेक्ट अतिशय उपयुक्त असून, आर्थिक सुलभता आणण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे. राज्य शासनाच्या विचाराला पोषक हे दालन आहे . या उपक्रमाला वाशिम जिल्हा उत्पादक संघ बालनाथ शेतकरी उत्पादक कंपनी बाळखेडा, कृषी माउली शेतकरी उत्पादक संघ चांभई, श्री समर्थ ग्रीन कंपनी शेलगाव बोंदाडे, हरी ओम ऍग्रो कंपनी किनखेडा, महाविदर्भ शेतकरी उत्पादक संघ वाकद, करुणेश्वर शेतकरी उत्पादक संघ करंजी, दे वळेश्वर कंपनी देऊळगाव बंडा व संत ज्ञानेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी किनखेडा यांचे सहकार्य मिळाले.