वाशिम शहरात अतिक्रमण हटाव मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 16:04 IST2019-12-03T16:04:00+5:302019-12-03T16:04:14+5:30
पहिल्या दिवशी ३ डिसेंबर रोजी स्थानिक अकोला नाका परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले.

वाशिम शहरात अतिक्रमण हटाव मोहिम
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम शहराला अतिक्रमणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी नगर परिषदेने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेतली आहे. पहिल्या दिवशी ३ डिसेंबर रोजी स्थानिक अकोला नाका परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले.
वाशिम शहराला अतिक्रमणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी यापूर्वी अनेकवेळा अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. अतिक्रमण हटविल्यानंतर काही दिवसातच पुन्हा जैसे थे परिस्थिती होते. शहरातील पाटणी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानक चौक, पोस्ट आॅफिस चौक, अकोला नाका चौक आदी परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. सुरळीत वाहतुकीसाठी तसेच प्रमुख चौक व फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी नगर परिषदेने ३ डिसेंबरपासून पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. पहिल्या टप्प्यात अकोला नाका परिसरातील अतिक्रमणातील सर्व दुकाने हटविण्यात आली आहेत. लघु व्यावसायिकांच्या दुकानांचे खोके हटविण्यात आल्याने पर्यायी जागा देण्याची मागणी पुढे आली.