Another death in Washim district; 242 corona positive | वाशिम जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू; २४२ कोरोना पाॅझिटिव्ह

वाशिम जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू; २४२ कोरोना पाॅझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी एका जणाचा मृत्यू तर २४२  जणांचा कोरोना चाचणी अहवाल ७ मार्च रोजी पाॅझिटिव्ह आला. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या १०,२२० वर पोहोचली आहे. रविवारी १४६ जणांनी काेरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
गत काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्हा कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वाशिम येथील ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद रविवारी घेण्यात आली. एकूण २४२ जण पाॅझिटिव्ह आढळून आले. यामध्ये वाशिम शहरातील ३३, लाखी येथील १, वारा जहांगीर १, अनसिंग २, कुंभी  १, ब्रह्मा २, तोरणाळा २, मालेगाव शहरातील ७, राजुरा येथील १, ब्राह्मणवाडा  १, मानोरा शहरातील २, म्हसनी १, पोहरादेवी १, साखरडोह १, मंगरूळपीर शहरातील ५, चांदई १, येडशी १, पेडगाव १, शेलूबाजार २, रामसिंगवाडी १, धोत्रा १, गोलवाडी ४, वार्डा फार्म येथील १, नवीन सोनखास १, चिंचखेडा २, कुंभी  ७, कोठारी  २, जांब येथील १, रिसोड शहरातील ५, बिबखेडा १, केशवनगर १, केनवड १, चाकोली १, असोला १, गोभणी २, पवारवाडी १, मोप १, कारंजा शहरातील वनदेवी नगर १, विद्याभारती कॉलनी १, कीर्तीनगर १, सुदर्शन कॉलनी १, मेन रोड परिसर १, मेमन कॉलनी १, प्रशांतनगर १, कॉटन मार्केट १, चवरे लाईन  ६, संतोषी माता कॉलनी २, तुळजा भवानी नगर १, पोलीस वसाहत परिसरातील १, गौतम नगर २, तुषार कॉलनी  २, अन्य ठिकाणचे २३, पोहा ४, महागाव येथील २, आखतवाडा १, वाल्हई १, पसरणी ६, धोत्रा जहांगीर १०, धनज बु. ७, भामदेवी २, समृद्धी महामार्ग जवळील १, हिंगणवाडी येथील ३, शेमलाई ४, भुलोडा  २, वापटा १, सोहळ ५, कामठवाडा येथील १, पिंप्री मोडक २, उंबर्डा बाजार १, खेर्डा  २, लाडेगाव १, किन्ही रोकडे १, नरेगाव ३, मनभा २, धोत्रा देशमुख १, यावर्डी १, दादगाव येथील ११, बेलमंडल ७, दोनद २, गणेशपूर २, भिलखेडा १, वढवी १, घोटा १, बेंबळा २ व्यक्तींचा समावेश आहे.  जिल्ह्याबाहेरील ६ बाधितांची नोंद झाली असून १४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Another death in Washim district; 242 corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.