पोहरादेवी येथे आणखी २१ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 18:35 IST2021-02-28T18:35:01+5:302021-02-28T18:35:19+5:30
CoronaVirus News महंत कबिरदास महाराज व त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

पोहरादेवी येथे आणखी २१ कोरोना पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी २३ फेब्रुवारी राेजी शक्तीप्रदर्शन केलेल्या पोहरादेवी येथील २१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २८ फेब्रुवारी राेजी पॉझिटिव्ह आला आहे. संजय राठोड यांनी भेट दिल्याच्या दोन दिवसनंतर मंदिराचे महंत कबिरदास महाराज उपाख्य कबीर राठोड व त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल पॉझिटिव्ह आला होता. गावातून २४ फेब्रुवारी राेजी १२३ जणांचे नमूने चाचणीसाठी पाठविण्यात आले हाेते.
मानाेरा तालुक्यातील एकूण ३२ जण काेराेना पाॅझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये पाेहरादेवी येथील २१ जणांचा समावेश आहे. यामध्ये मानोरा शहरातील संतोषी माता मंदिर परिसरातील २, पोहरादेवी येथील २१, वाईगौळ येथील ४, कुपटा येथील २, गादेगाव येथील १, सोयजना येथील २, विठोली येथील १, कारखेडा येथील १ असे एकूण ३२ जणांचा अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे.