वाशिम जिल्ह्यात आणखी १६ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 18:40 IST2021-01-10T18:40:45+5:302021-01-10T18:40:51+5:30
CoronaVirus नऊ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

वाशिम जिल्ह्यात आणखी १६ कोरोना पॉझिटिव्ह
वाशिम : जिल्ह्यात आणखी १६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १० जानेवारी रोजी पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधितांची संख्या ६,७७२ वर पोहोचली आहे. दरम्यान, नऊ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
जानेवारी महिन्यातही जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहे. रविवारी एकूण १६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील योजना कॉलनी परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, पिंपळगाव येथील २, रिसोड शहरातील २, मोहजा येथील १, भोकरखेडा येथील २, पळसखेड येथील १, मालेगाव तालुक्यातील आमखेडा येथील १, मंगरुळपीर शहरातील जांब रोड येथील १, कारंजा शहरातील महसूल कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणची १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ६,७७२ वर पोहोचला आहे. रविवारी नऊ जणांना रुग्णालयातून सुटी झाली. आतापर्यंत कोरोनामुळे १५१ जणांचा मृत्यू झाला.
१०६ जणांवर उपचार
जिल्ह्यात आतापर्यंत ६,७७२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ६,५१४ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे १०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.