जिल्ह्यात आणखी १६ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:30 IST2021-02-05T09:30:15+5:302021-02-05T09:30:15+5:30
वाशिम : जिल्ह्यात आणखी १६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २५ जानेवारी रोजी ‘पॉझिटिव्ह’ आला. एकूण ...

जिल्ह्यात आणखी १६ कोरोना पॉझिटिव्ह
वाशिम : जिल्ह्यात आणखी १६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २५ जानेवारी रोजी ‘पॉझिटिव्ह’ आला. एकूण बाधितांची संख्या ७,०२८ वर पोहोचली आहे. दरम्यान, सोमवारी १२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरोनाबाधितांचा आलेख चढता होता. त्यानंतर कोरोनाचा आलेख खाली येत आहे. जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढउतार दिसून येत आहे. सोमवारी, १६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील गुरुवार बाजार येथील १, काळे फाइल येथील ४, लाखाळा येथील १, सिव्हील लायन्स येथील १, तोरणाळा येथील १, शिरपुटी येथील १, जांभरुण महाली येथील १, मंगरुळपीर शहरातील संभाजीनगर येथील १, रिसोड तालुक्यातील रिठद येथील २, मालेगाव तालुक्यातील वाळकेवाडी येथील १, कारंजा शहरातील जे.डी. चावरे स्कूलजवळील १, विठ्ठल मंदिरजवळील एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे.
जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ७,०२८ वर पोहोचला आहे. सोमवारी १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ६,७१९ जणांनी कोरोनावर मात केली.
दरम्यान, कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, कोरोनाविषयक लक्षणे दिसून येताच चाचणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
०००
१५६ जणांवर उपचार
आतापर्यंत ७,०२८ जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ६,७१९ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे १५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.