जिल्ह्यात आणखी १२ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:29 IST2021-02-05T09:29:18+5:302021-02-05T09:29:18+5:30

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ३ एप्रिल रोजी मेडशी (ता. मालेगाव) येथे आढळून आला होता. सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरोनाबाधितांचा आलेख चढता ...

Another 12 corona positive in the district | जिल्ह्यात आणखी १२ कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आणखी १२ कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ३ एप्रिल रोजी मेडशी (ता. मालेगाव) येथे आढळून आला होता. सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरोनाबाधितांचा आलेख चढता होता. त्यानंतर कोरोनाचा आलेख खाली येत आहे. जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहे. शनिवारी, १२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील आययूडीपी येथील १, पाटणी चौक येथील १, बसस्थानकजवळील १, रिसोड शहरातील लोणी फाटा येथील २, कंकरवाडी येथील १, मंगरुळपीर शहरातील महावीर कॉलनी येथील १, लाही येथील १, कारंजा शहरातील वनदेवीनगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, मानोरा तालुक्यातील कुपटा येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेर एका बाधिताची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची तपासणी आरोग्य विभागातर्फे केली जात आहे.

जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ७,१२२ वर पोहोचला आहे. शनिवारी २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ६,८१५ जणांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत असल्याने, नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, कोरोनाविषयक लक्षणे दिसून येताच चाचणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.

०००

१५३ जणांवर उपचार

आतापर्यंत ७,१२२ जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ६,८१५ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे १५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

००

शहरात रुग्ण वाढले

अलीकडच्या काळात वाशिम शहरातही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते.

Web Title: Another 12 corona positive in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.