जिल्ह्यात आणखी १२ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:41 IST2021-01-25T04:41:25+5:302021-01-25T04:41:25+5:30

जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी पहिला कोरोना रुग्ण आढळून आला होता. जून महिन्यापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात होती. सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांच्या ...

Another 12 corona positive in the district | जिल्ह्यात आणखी १२ कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आणखी १२ कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी पहिला कोरोना रुग्ण आढळून आला होता. जून महिन्यापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात होती. सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. त्यानंतर कोरोनाचा आलेख खाली येत आहे. जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहे. रविवारी १२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम तालुक्यातील अडोळी येथील १, रिसोड तालुक्यातील शेलू येथील १, मालेगाव शहरातील गाडगे नगर येथील ३, इतर ठिकाणचा १, मंगरूळपीर शहरातील १, वरुड येथील १, कारंजा तालुक्यातील वाढवी येथील २, मानोरा तालुक्यातील मोहगव्हाण येथल १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेर एका बाधिताची नोंद झाली आहे. जिल्ह्याबाहेर एका कोरोनाबाधिताची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ७,०१२ वर पोहोचला आहे. रविवारी २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ६,७०७ जणांनी कोरोनावर मात केली.

दरम्यान, कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा, बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, कोरोनाविषयक लक्षणे दिसून येताच चाचणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले

००००

१५२ जणांवर उपचार

आतापर्यंत ७,०१२ जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ६,७०७ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे १५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

Web Title: Another 12 corona positive in the district