शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

पशू खाद्याचे दर भिडले गगणाला!

By admin | Updated: April 14, 2017 01:22 IST

वाशिम : दुधाळ जनावरांचे प्रमुख खाद्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरकी ढेपीचे दर सध्या गगणाला भिडले असून, २०१६ च्या तुलनेत सध्या हे दर दुपटीने वाढले आहेत.

वाशिम : दुधाळ जनावरांचे प्रमुख खाद्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरकी ढेपीचे दर सध्या गगणाला भिडले असून, २०१६ च्या तुलनेत सध्या हे दर दुपटीने वाढले आहेत. विदर्भातून कपाशीचे पीक हद्दपार होण्यासोबतच आॅईल कंपन्यांनी ढेपेचा अनधिकृतरीत्या साठा करुन ठेवल्यानेच ही विदारक स्थिती उद्भवल्याचा सूर जाणकारांमधून आळविला जात आहे.सरकीपासून तयार होणाऱ्या ढेपीचे दर गतवर्षी अर्थात २०१६ मध्ये १६०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटल होते; तर सद्या या दरांत झालेल्या तुफानी वाढीमुळे बाजारपेठेत सरकी ढेपेची तब्बल २७०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटलने विक्री होत आहे. यामुळे दुधाचा व्यवसाय करणारे सर्वसामान्य पशूपालक आर्थिक डबघाईस आले असून त्यांना दुधाचा व्यवसाय करणे परवडेनासे झाले आहे.वाशिम जिल्ह्यात प्रामुख्याने गुजरात, आदिलाबाद, आंध्रप्रदेश, भैसा, अमरावती, अकोला, परभणी, हिंगोली, जळगांव आदी शहरांमध्ये असलेल्या आॅईल मीलमधून सरकीपासून तेल काढल्यानंतर तयार होणारी ढेप वाशिम जिल्ह्यात विक्रीसाठी आणली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कपाशीच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट झाल्याने आॅईल कंपन्यांना पुरेशा प्रमाणात सरकी मिळणे दुरापास्त झाल्याने त्याचा थेट परिणाम ढेपेच्या दरवाढीवर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. असे असले तरी सरकी ढेपेची देखील संबंधित व्यावसायिकांनी अनधिकृतरित्या साठवण करुन ठेवल्यामुळेच दर वाढल्याची शक्यता जाणकारांमधून वर्तविली जात आहे. यासंदर्भात प्रशासनाने चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.