शहरं
Join us  
Trending Stories
1
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
2
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
3
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
4
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
5
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
6
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
7
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
8
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
9
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
10
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
11
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
12
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
13
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
14
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
15
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
16
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
17
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
18
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
19
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त सदस्यांचा सर्वसाधारण सभेत गोंधळ!

By admin | Updated: May 11, 2016 03:07 IST

वाशिम जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभेला विलंब; ठरावांची अंमलबजावणी होत नसल्याचा निषेध.

वाशिम: सर्वसाधारण सभेतील ठरावांची अंमलबजावणी होत नसल्याचा निषेध आणि मंगळवारच्या सभेला होत असलेला प्रचंड विलंब पाहून संतप्त झालेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी सभागृहातील खुच्र्यांची अक्षरश: फेकाफेक केली. अडीच वर्षांच्या कार्यकाळात अनेक सदस्यांच्या संयमाचा असा उद्रेक झाल्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जाते. जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात १0 मे रोजी सकाळी ११ वाजता सर्वसाधारण सभेला सुरुवात होणार होती. निर्धारित वेळेपेक्षा तब्बल तीन तास झाल्यानंतरही सभागृहात कुणी येत नसल्याचे पाहून सत्ताधारी व विरोधी बाकावरील सदस्य संतप्त झाले. संयमाचा बांध फुटल्याने संतप्त सदस्यांनी सभागृहातील मंचावरील खुच्र्यांची फेकफाक सुरू केली तसेच ह्यडायसह्ण लोटून दिले. विरोधी बाकावरील काही सदस्यांनी खिडक्यांच्या काचाही फोडल्या. सभागृहातील हा गदारोळ अधिकारी-पदाधिकार्‍यांच्या कानावर गेल्याने सर्व जण २ वाजता सभागृहात आले आणि वातावरण शांत करण्याचा प्रयत्न झाला. माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य हेमेंद्र ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य स्वप्निल सरनाईक, शिवदास राऊत, वाशिम पंचायत समितीचे सभापती वीरेंद्र देशमुख, जि.प. सदस्य रणजित जाधव, चिंतामन खुळे, अनिल कांबळे, उषा अनिल जाधव, रजनी महादेव ताटके, विश्‍वास गोदमले, गौरी पवार यांच्यासह सत्ताधारी व विरोधी बाकावरील सदस्यांनी सभेला विलंब होत असल्याच्या घटनेचा निषेध नोंदविला.