शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचे ग्रहण सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 2:13 PM

राज्यातील वाशिमसह चार आकांक्षित जिल्ह्याला या निर्बंधातून ८ आॅक्टोबरला वगळण्यात आले असून १ नोव्हेंबरपासून अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत.

वाशिम : अल्प उपस्थितीच्या अंगणवाड्यांचे एकत्रिकरण करणे, सुधारीत अंगणवाड्यांची संख्या निश्चित होईपर्यंत अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरण्यावर निर्बंध आहेत. तथापि, राज्यातील वाशिमसह चार आकांक्षित जिल्ह्याला या निर्बंधातून ८ आॅक्टोबरला वगळण्यात आले असून १ नोव्हेंबरपासून अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत.‘अंब्रेला’ एकात्मिक बालविकास सेवा योजना या मुख्य योजनेखाली राबविण्यात येणाºया ‘अंगणवाडी सेवा’ या उपयोजनेखाली यापुढे अंगणवाडी केंद्रे तसेच क्षेत्रीय कार्यालये कार्यरत राहणार आहेत. सुधारीत अंगणवाड्यांची संख्या निश्चित होईपर्यंत सेविकांची रिक्त पदे न भरण्याबाबत राज्याच्या वित्त विभागाच्या दिलेल्या सुचनेनुसार रिक्त पदांची भरती प्रक्रिया थांबलेली आहे. तथापि, आदिवासी भागातील तसेच आकांक्षित जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची रिक्त पदे भरण्याबाबत लोकप्रतिनिधींकडून शासनस्तरावर मागणी झाली होती. या मागणीची दखल घेत वाशिम, गडचिरोली, नंदूरबार व उस्मानाबाद या चार आकांक्षित जिल्ह्यातील तसेच गोंदीया, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील काही भाग, पालघर संपूर्ण जिल्हा आणि अमरावती जिल्ह्यातील मेळघाट, धारणी व चिखलदरा या तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरण्याला महिला व बालविकास विभागाने ८ आॅक्टोबरला हिरवी झेंडी दाखविली आहे. त्या अनुषंगाने १ नोव्हेंबरपासून भरण्याची कार्यवाही केली जाणार आहे. 

वाशिम जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांची जवळपास ३२ तर मदतनिसांची जवळपास ४५ पदे रिक्त आहेत. वरिष्ठांच्या सुचनेनुसार रिक्त पदे भरण्यासंदर्भात १ नोव्हेंबरपासून कार्यवाही केली जाईल.- नितीन मोहुर्ले,उपमुख्य कार्यकारी अधिकारी,महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद वाशिम

टॅग्स :washimवाशिमEmployeeकर्मचारी