शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

अंगणवाडीतील पोषण आहार वाटप प्रकरण : पर्यवेक्षिका, सीडीपीओंना ‘कारणे दाखवा’ नोटीस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 1:02 PM

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पोषण आहारासंदर्भात जिल्ह्यातील काही अंगणवाडी केंद्रांमध्ये नियोजित वेळापत्रक व नियम पाळले जात नसल्याचा प्रकार ‘लोकमत’ने २६ सप्टेंबर रोजी स्टिंग आॅपरेशनने उजागर करताच, मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी या वृत्ताची दखल घेत अंगणवाडी पर्यवेक्षिका, बालविकास प्रकल्प अधिकाºयांना (सीडीपीओ) बुधवारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.अंगणवाडी केंद्रातून बालकांना दोन वेळेला ताजा ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पोषण आहारासंदर्भात जिल्ह्यातील काही अंगणवाडी केंद्रांमध्ये नियोजित वेळापत्रक व नियम पाळले जात नसल्याचा प्रकार ‘लोकमत’ने २६ सप्टेंबर रोजी स्टिंग आॅपरेशनने उजागर करताच, मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी या वृत्ताची दखल घेत अंगणवाडी पर्यवेक्षिका, बालविकास प्रकल्प अधिकाºयांना (सीडीपीओ) बुधवारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.अंगणवाडी केंद्रातून बालकांना दोन वेळेला ताजा पोषण आहार पुरविला जावा, कोणत्या दिवशी कोणता ‘मेन्यू’ द्यावा याचे आठवडी नियोजन ठरवून देण्यात आलेले आहे. या विषयाच्या अनुषंगाने २४ व २५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील काही अंगणवाडी केंद्रांत प्रातिनिधिक स्वरुपात स्टिंग आॅपरेशन केले असता, काही केंद्रात ‘आठवडी मेन्यु’नुसार पोषण आहार दिला जात नाही तसेच काही केंद्रात सकाळी शिजविलेलाच आहार दुपारी दिला जातो तर काही केंद्राच्या दर्शनी भागात माहिती फलक लावली नसल्याचे आढळून आले होते. या ‘स्टिंग’ची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी बुधवारी अंगणवाडी पर्यवेक्षिका, बालविकास प्रकल्प अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अंगणवाडी केंद्रात आठवडी नियोजनानुसारच पोषण आहार दिला जावा, प्रत्येक अंगणवाडी केंद्रात पोषण आहारासंदर्भात माहितीदर्शक फलक लावण्यात यावे, सकाळ व दुपारी शिजविलेला ताजा आहारच बालकांना देण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना देतानाच यामध्ये कुणी दिरंगाई केली तर शासन नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा मीना यांनी दिला.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा