अमरावती विभागावर जलसंकट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 03:07 IST2017-09-11T03:07:59+5:302017-09-11T03:07:59+5:30
वाशिम : अमरावती विभागात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत १0 सप्टेंबरपर्यंत निम्माच पाऊस पडल्याने प्रकल्पांतील जलसाठय़ात वाढ झाली नाही. प्राप्त माहीतीनुसार विभागातील ४४३ प्रकल्पांत केवळ २६.५४ टक्के उपयुक्त जलसाठा असल्याने विभागावर जलसंकट घोंगावत आहे.

अमरावती विभागावर जलसंकट!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अमरावती विभागात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत १0 सप्टेंबरपर्यंत निम्माच पाऊस पडल्याने प्रकल्पांतील जलसाठय़ात वाढ झाली नाही. प्राप्त माहीतीनुसार विभागातील ४४३ प्रकल्पांत केवळ २६.५४ टक्के उपयुक्त जलसाठा असल्याने विभागावर जलसंकट घोंगावत आहे.
आरक्षणाची गरज
सद्यस्थिती पाहता जनतेला डिसेंबर महिन्यापासूनच पाणीटंचाईला सोमारे जावे लागेल, अशी भीती आहे. आतापासूनच संबंधीत विभागाने पाणी आरक्षीत करण्याची गरज आहे.