अमित झनक अपघातात जखमी

By Admin | Updated: June 26, 2017 09:31 IST2017-06-26T09:31:57+5:302017-06-26T09:31:57+5:30

रिसोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांच्या वाहनाला चांडस येथे अपघात; अन्य तीन किरकोळ जखमी.

Amit jammed injured in accident | अमित झनक अपघातात जखमी

अमित झनक अपघातात जखमी

वाशिम : रिसोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांच्या वाहनाला चांडस येथे अपघात झाला. त्या ते किरकोळ जखमी झाले असून, अन्य चार जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी ६.४५ वाजता घडली.
मांगूळ झनक येथून मालेगाव येथे येत असताना त्यांचे वाहन (एम एच ३७ जी ४५११) चांडस फाट्यानजीक असलेल्या रेतीच्या गांज्यावरून उसळले. या अपघातात झनक यांना किरकोळ मर लागला तर चालक श्याम ठाकरे, अंगरक्षक गिऱ्हे, वैजनाथ घायाळ आणि सखाराम आंबेकर हे जखमी झाले सर्व जखमींवर वाशिम येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, आपण सुखरूप असल्याचे झनक यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: Amit jammed injured in accident