आंबेडकर जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:39 IST2021-04-15T04:39:32+5:302021-04-15T04:39:32+5:30

येथील ग्रामपंचायत भवनमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच पी. के. चोपडे, उपसरपंच ...

Ambedkar Jayanti celebration | आंबेडकर जयंती साजरी

आंबेडकर जयंती साजरी

येथील ग्रामपंचायत भवनमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच पी. के. चोपडे, उपसरपंच वर्षा महादेव काळदाते व सदस्यांची उपस्थिती होती. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, महात्मा जोतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून पंचशील पठण करण्यात आले, तर मल्हारी फुके, महादेव क्षीरसागर यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला उजाळा दिला. यावेळी संचालन सुधाकर सभादिंडे यांनी केले. जिल्हा परिषद शाळेच्या वतीने सुद्धा अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती. शिवाजी विद्यालयामध्ये प्राचार्य आर. आर. काळदाते, प्रा. श्रीकांत काळदाते, एस. एस. सोईतकर, जायभाये, राजेश घाटे यांनी विचार व्यक्त केले.

Web Title: Ambedkar Jayanti celebration