कृषी सेवा केंद्र सुरु ठेवण्यास मुभा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:39 IST2021-05-16T04:39:58+5:302021-05-16T04:39:58+5:30
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सध्या शेतकऱ्यांकडे रासायनिक खत व बियाण्यांची मोठ्या प्रमाणात मागणी सुरू झाली आहे. या कालावधीत ७५ टक्क्यांपेक्षा ...

कृषी सेवा केंद्र सुरु ठेवण्यास मुभा द्या
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सध्या शेतकऱ्यांकडे रासायनिक खत व बियाण्यांची मोठ्या प्रमाणात मागणी सुरू झाली आहे. या कालावधीत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांकडून खत व बियाण्यांची दरवर्षी उचल केली जाते. त्यानुसार, कृषी सेवा केंद्र चालक खत व बियाण्यांची साठवणूक करून ठेवतात. यंदाही त्याचे नियोजन करण्यात आले आहे; मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कृषी सेवा केंद्रांना विक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून शेतकऱ्यांना रासायनिक खतांची विक्री ऑनलाईन करणेदेखिल शक्य नाही. त्यामुळे दुकाने सुरू ठेवण्यास मुभा द्यावी. २०२० च्या खरीप हंगामात कृषी सेवा केंद्रांनी गर्दी न होऊ देता शेतकऱ्यांना बियाणे व खत विक्री केली. सर्व नियमांचे पालन करण्यात येऊन शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यात आली. त्याचप्रमाणे खरीप हंगाम २०२१ च्या अनुषंगाने कृषी सेवा केंद्र सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हा कृषी निविष्ठा विक्रेता संघटनेने केली आहे.