शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

युतीचा घटस्फोट आघाडीच्या पथ्यावर

By admin | Updated: September 19, 2014 23:49 IST

वाशिम जिल्हात राजकीय पक्षांकडे प्रबळ उमेदवारांची वाणवा: कार्यकर्त्यांचीही भासणार कमतरता.

नागेश घोपेवाशिम- गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतच्या निवडणुका गळ्यात गळे घालून लढणार्‍या शिवसेना-भाजप युतीचा घटस्फोट जिलत काँग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या पथ्यावर पडणार आहे. दुभंगणार्‍या युतीमुळे तिन्ही मतदारसंघातील राजकीय समिकरणांची पुरती उलथापालथ होणार असून यामध्ये दोन्ही पक्षांचेही पानीपत होण्याचे संकेत आहेत.जिलतील विधानसभेच्या तीन मतदारसंघापैकी दोन मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या तर एक मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्यावर आहे. यापैकी अनुसुचित जातीच्या उमेदवारासाठी आरक्षित असलेला वाशिम मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा गड मानला जातो.मतदारसंघातील वाशिम शहराचा अपवाद वगळता ग्रामीण भागात तथा मंगरूळपीर तालुक्यात भाजपाच्या तुलनेत शिवसेनेचीच राजकीय शक्ती अधिक आहे.युतीच्या घटस्फोटामुळे भाजपच्या या गडाला सुरूंग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.मालेगाव व रिसोड या दोन तालुक्यांचा समावेश असलेल्या रिसोड मतदारसंघात भाजपचे संघटन बर्‍यापैकी असले तरी, शिवसेनेचे प्राबल्यही कमी नाही. यावेळी युती तुटली तर,येथे भाजपला फटका निश्‍चित मिळणार आहे.जिलतील कारंजा हा एकमेव मतदारसंघ शिवसेच्या वाट्यावर आहे. कारंजा व मानोरा तालुक्याचा या मतदारसंघात समावेश कारंजा शहरात शिवसेनेच्या तुलनेत भाजपची ताकद अधिक आहे. ग्रामीण भागातही भाजपची पाळेमुळे खोलवर रूजलेली आहेत.त्यामुळे स्वबळावर नशिब आजमाविण्याच्या विचारात असलेल्या शिवसेनेला येथे विजयाच्या गावापर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही. एकंदरीत शिवसेना व भारतीय जनता पक्षाची युती दुभंगल्यास जिलत त्याचा सर्वाधिक राजकीय फायदा काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला होणार असल्याचे आडाखे जाणकारांकडून बांधले जात आहेत.