रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आराेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:26 IST2021-07-09T04:26:31+5:302021-07-09T04:26:31+5:30

मानोरा नगरपंचायतमधील विशेष रस्ता अनुदान दोन कोटी रुपये रस्ता निधीमधील कामे व नव्याने स्थापन नगरपंचायत योजना अंतर्गत सहा कोटी ...

Allegations of poor quality of road works | रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आराेप

रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आराेप

मानोरा नगरपंचायतमधील विशेष रस्ता अनुदान दोन कोटी रुपये रस्ता निधीमधील कामे व नव्याने स्थापन नगरपंचायत योजना अंतर्गत सहा कोटी रुपयांचे रस्त्याची कामे २२ नोव्हेंबर २०१६ च्या सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार न करता निकृष्ट दर्जाची केली आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदार व काम पाहणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी यांच्याकडे

मानोरा नगरपंचायतीच्या माजी उपाध्यक्ष निखतजबींन रशीद खान पठाण यांनी ६ जुलैला केली

.

यापूर्वी दिनांक ११ फेब्रुवारी २०२० रोजी १६ नगरसेवकांनी याबाबत तक्रार केली होती. तेव्हापासून या कामाची चौकशी करण्यात आली नाही. सर्वच प्रभागात केलेली कामे निकृष्ट केली असून, या कामाची पाहणी करावी, अशी मागणी हाेत आहे.

Web Title: Allegations of poor quality of road works