जिल्हा प्रशासनाकडून सर्वताेपरी मदत - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:40 IST2021-02-13T04:40:15+5:302021-02-13T04:40:15+5:30

भारतीय जैन संघटनेचा वाशिम जिल्ह्यात शिक्षण,आरोग्य आणि जलसंधारण या विषयात जिल्हा प्रशासनासोबत पूरक काम करण्याचा मानस आहे .जिल्हाधिकारी कार्यालयात ...

All help from district administration - Collector | जिल्हा प्रशासनाकडून सर्वताेपरी मदत - जिल्हाधिकारी

जिल्हा प्रशासनाकडून सर्वताेपरी मदत - जिल्हाधिकारी

भारतीय जैन संघटनेचा वाशिम जिल्ह्यात शिक्षण,आरोग्य आणि जलसंधारण या विषयात जिल्हा प्रशासनासोबत पूरक काम करण्याचा मानस आहे .जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागांच्या अधिकाऱ्यासोबत ही बैठक पार पडली. आगामी काळात जिल्ह्यातील सर्व घटकांच्या विकासाचे उद्दिष्ट ठेवून काम करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. वाशिम जिल्ह्यात विकासकामे करण्यासाठी बीजेएस तयारी करीत आहे.बीजेएसच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात आरोग्य केंद्रे,प्राथमिक शाळा,जलसंधारण कामे झालेल्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन आढावा घेतला आहे. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते,निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे,जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागांचे प्रमुख आणि बीजेएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल फणसे,सुजलाम सुफलामच्या सपना सिंग,आरोग्य विभाग संचालक जितेंद्र सावकार,शिक्षण विभागाच्या संचालक मीनल दशपुत्रे,बुलडाणा बीजेएस जिल्हा समन्वयक राजेश देशलहरा,वाशिम जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेचा आदि उपस्थित होते.

Web Title: All help from district administration - Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.