मद्यपी मुलाची वडिलांना मारहाण!

By Admin | Updated: February 7, 2017 03:04 IST2017-02-07T03:04:24+5:302017-02-07T03:04:24+5:30

मानोरा तालुक्यातील पंचाळा येथील घटना; गुन्हा दाखल.

Alcoholic boy beat his father! | मद्यपी मुलाची वडिलांना मारहाण!

मद्यपी मुलाची वडिलांना मारहाण!

मानोरा, दि. ६- दारूच्या नशेत पत्नीस मारहाण करणार्‍या आपल्याच मद्यपी मुलास समजाविण्यासाठी गेलेल्या वडिलांना मुलाने डोक्यावर लोखंडी गज मारून जखमी केले. तालुक्यातील पंचाळा येथे सोमवार, ६ फेब्रुवारीला घडलेल्या या घटनेत दाखल तक्रारीवरून पोलिसांनी मद्यपी मुलावर गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात पंचाळा येथील फिर्यादी उत्तम कणीराम राठोड (वय ६५ वर्षे) यांनी पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की त्यांचा मुलगा बाळू उत्तम राठोड हा त्यांच्याच घराच्या शेजारी राहत असून तो नेहमीच दारूच्या नशेत शिवीगाळ करून मारहाण करतो. ६ फेब्रुवारीला सकाळी ७ वाजता बाळूने दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांचे भांडण सोडविण्यासाठी गेलो असता, बाळूने आपणावरही लोखंडी गजाने हल्ला चढविला. यात डोक्याला आणि हाताला जबर दुखापत झाली. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बाळू राठोड याच्याविरुध्द कलम ३२४, ५0४, ५0६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक रामकृष्ण मळघने यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार शिवा राठोड याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Alcoholic boy beat his father!