‘जय भवानी जय शिवाजी’ चा गजर
By Admin | Updated: March 9, 2015 02:18 IST2015-03-09T02:18:29+5:302015-03-09T02:18:29+5:30
मिरवणुकीला प्रतिसाद; तोफे द्वारे पुष्प उधळले

‘जय भवानी जय शिवाजी’ चा गजर
वाशिम : शिवसेनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातून भव्य रॅली काढून शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे पूजन व हारार्पण ८ मार्चला करण्यात आले. यावेळी सर्वत्र ह्यजय भवानी जय शिवाजीह्णचा गजर होता. शहराच्या विविध मार्गांंंवरून शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांंंची मोठय़ा प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी शिवाजी चौकात शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ावर तोफे द्वारे पुष्प उडविण्यात आले. माजी नगराध्यक्ष दिलीप हेडा यांच्यासह विविध मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या पुतळय़ास हारार्पण केले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख माणिकराव देशमुख, गजानन भांदुर्गे, रामदास मते, दिलीप काष्टे, गणेश पवार, रामा इंगळे, कैलास गोरे, विजय खानझोडे, अशोक पत्की, रवी पाटील, खंदारे महाराज, देवीदास देशमाने, गजानन जोगदंड, राजू अग्रवाल, बंडू शिंदे, अविनाश गव्हाणकर, पंकज इंगोले, रवी भांदुर्गे, शेखर हिरगुडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणात उपस् िथत होते.