शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अकाेला - वाशिम महामार्गाच्या कडेला ओंडक्यांचे ढीग, अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 11:19 IST

Akala - Washim highway चाैपदरीकरणाचे काम करताना अकाेल्यापासून ते मेडशीपर्यंत दुतर्फा लिंबाचे वृक्ष ताेडले जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम   : अकाेला - वाशिम दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या चाैपदरीकरणाचे काम सुरु आहे. सदर काम मेडशी-मालेगावपर्यंत  करण्यात आले. चाैपदरीकरणाचे काम करताना अकाेल्यापासून ते मेडशीपर्यंत दुतर्फा लिंबाचे वृक्ष ताेडले जात आहेत. ताेडलेल्या वृक्षांचे ओंडके रस्त्याच्या दाेन्ही  बाजूला तसेच पडून असल्यामुळे या मार्गावर अपघाताच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे.अकाेल्यापासून वाशिम जिल्ह्यात चाैपदरीकरणाच्या कामाचे कंत्राट गुजरातच्या माेंटाे कार्लाे कंपनीने घेतले आहे. त्यांचे कार्यालय मालेगाव नजीक आहे. सदर कंपनीने रस्त्याच्या चाैपदरीकरणासाठी महामार्गाच्या दुतर्फा इंग्रज काळात लावण्यात आलेले लिंबाचे वृक्ष ताेडण्याची माेहीम हाती घेतली आहे. ताेडलेल्या वृक्षांचा मलबा रस्त्याच्या दुतर्फा पडून असल्यामुळे अपघातामध्ये कमालीची वाढ झाली असताना संबंधितांकडून काेणतीच उपाययाेजना केल्या जात नसल्याचे समाेर आले आहे. रस्त्याच्या कडेला टाकून ठेवण्यात आलेले लाकडाचे ओंडके रात्रीच्या वेळी वाहनचालकांना दिसून येत नसल्याने अपघातात वाढ झाली आहे. दरराेज या मार्गावर किरकाेळ स्वरुपाचे अपघात हाेत असताना संबंधित कंपनी माेठ्या अपघाताची प्रतीक्षा करीत आहे का असा प्रश्न वाहनधारक विचारत आहेत. विशेष म्हणजे या कामावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालय वाशिम यांच्याकडे देखरेखीची जबाबदारी साेपविण्यात आली असताना त्यांच्याकडूनही काेणतीच दखल घेण्यात आली नसल्याचे दिसत  आहे. गावातील काही नागरिक रात्रीच्या वेळी  लाकडे चाेरुन नेत आहेत. मात्र यावर ना कंपनी ना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयातील अधिकाऱ्यांना काही देणे घेणे नसल्याचे चित्र आहे. सदर कंपनीच्या वेळकाढू धाेरणामुळे वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहे. वृक्षताेड करताना अनावश्यक झाडांचीही कत्तल केली जात असल्याची बाब समाेर आली आहे. यामुळे या वृक्षताेडीची सखाेल चाैकशी करण्याची मागणी जिल्ह्यातील वृक्षप्रेमी करीत आहेत. यासंदर्भात माेंटाे कार्लाे कंपनीचे  सिनिअर मॅनेजर राजू तिवारी यांच्यासाेबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध हाेऊ शकले नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने लक्ष देऊन यावर तातडीने उपाययाेजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :washimवाशिमAkolaअकोलाhighwayमहामार्ग