अर्थसहाय्यासाठी बँकांना प्रत्येकी १०० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 16:30 IST2018-10-30T16:30:12+5:302018-10-30T16:30:34+5:30
वाशिम : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्यावतीने विशेष घटक योजनेमध्ये ५० हजार रुपयेपर्यंत अर्थसहाय्य तसेच बीजभांडवल योजनेमध्ये ५ लाख रुपयेपर्यंत अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

अर्थसहाय्यासाठी बँकांना प्रत्येकी १०० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्यावतीने विशेष घटक योजनेमध्ये ५० हजार रुपयेपर्यंत अर्थसहाय्य तसेच बीजभांडवल योजनेमध्ये ५ लाख रुपयेपर्यंत अर्थसहाय्य दिले जाणार आहे. जिल्ह्यातील विविध बँकांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या योजनांसाठी प्रत्येकी १०० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध या जात प्रवर्गातील युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक रमेश मनवर यांनी केले.
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध या जात प्रवर्गातील युवक-युवतींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील तसेच वाशिम जिल्ह्यातील रहिवाशी असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे १ लाख रुपयांच्या आत असावे. अर्जदाराचे वय २० ते ६० वर्षे या वयोगटातील असणे आवश्यक आहे. या अटी पूर्ण करणाºया गरजू बेरोजगार युवक-युवतींनी स्वयंरोजगारसाठी या योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, वाशिम या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन मनवर यांनी केले.