कृषी पदव्युत्तर प्रवेश परीक्षा मार्गदर्शन परिसंवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:31 IST2021-06-04T04:31:45+5:302021-06-04T04:31:45+5:30
या परिसंवादात कृषी अधिकारी संकेत चांभारे आणि प्रज्ञा बागडे यांनी राज्यातील कृषी पदव्युत्तर प्रवेश परीक्षेकरिता तयारी करणाऱ्या कृषी ...

कृषी पदव्युत्तर प्रवेश परीक्षा मार्गदर्शन परिसंवाद
या परिसंवादात कृषी अधिकारी संकेत चांभारे आणि प्रज्ञा बागडे यांनी राज्यातील कृषी पदव्युत्तर प्रवेश परीक्षेकरिता तयारी करणाऱ्या कृषी पदवीधरांना पेपर पॅटर्न, अभ्यासाचे सूक्ष्म नियोजन, स्कोअरिंग टॉपिक्स, ताणतणावाचे व्यवस्थापन, सोशल मीडियाचा परीक्षेच्या तयारीकरिता योग्य वापर कसा करता येईल या महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन केले. त्याच सोबत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन मार्गदर्शकांकडून करण्यात आले. परिसंवादाकरता प्रा. पंढरी पाठे यांचे सहकार्य मिळाले, सूत्रसंचालन प्रणव टोम्पे यांनी केले. यशस्वितेकरता अजित देशमुख, सूरज भगत, निहाल चौधरी आणि राजेश्वर राऊत यांनी परिश्रम घेतले. ग्रॅज्युएट्स असोसिएशन (पदवीधर संघटना) ही राज्यातील विद्यार्थी, पदवीधर आणि शेतकऱ्यांकरिता कार्यरत असणारी संस्था असून विद्यार्थी, शेतकरी आणि पदवीधरांचे शैक्षणिक, उद्योजकीय आणि रोजगारविषयक प्रश्न शासन-प्रशासन दरबारी मांडणे, पदवीधर आणि शेतकऱ्यांना शेती, शिक्षण आणि उद्योग विषयांवर सल्ला सेवा आणि मार्गदर्शन देणे कामी कार्यरत आहे.