कृषी अधिकारी व कर्मचार्यांनी उपसले आंदोलनाचे ‘हत्यार’
By Admin | Updated: August 12, 2014 00:13 IST2014-08-11T23:55:24+5:302014-08-12T00:13:30+5:30
विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी आंदोनलाचे हत्यार उपसले.

कृषी अधिकारी व कर्मचार्यांनी उपसले आंदोलनाचे ‘हत्यार’
वाशिम : तांत्रीक संवर्गातील वेतणश्रेणी व दर्जावाढीसह विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी आंदोनलाचे हत्यार उपसले. संतप्त झालेल्या या अधिकारी व कर्मचार्यांनी ११ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले कृषी विभागातील तांत्रीक संवर्गातील वेतनश्रेणी व दर्जावाढीबाबत मंत्रीमंडळाने १६ जूलै २00४ रोजी निर्णय घेतला. परंतू या निर्णयाची अंमलबजावणी अद्यापही झाली नाही. ही अंमलबजावणी तातडीने होण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी आग्रही आहेत. आपत्कालीन परिस्थीतीत शेतीपिकाचे नुकसान झाल्यास शेतकर्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी कृषी व सहकार विभागाचा शासन निर्णय १६ जूलै १९८३ अन्वये निर्धारित केलेल्या कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्याची मागणीही यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या धरणे आंदोलनात कृषी सहाय्यक संघटना, कृषी पर्यवेक्षक संघटना, कृषी अधिकारी संघटना, राजपत्रीत अधिकारी संघटना, कृषी सेवा राजपत्रीत अधिकारी संघटनेच्या पदाधिकार्यांसह सदस्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. इंगळे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, तालूका कृषी अधिकारी सिसोदिया, कृषी अधिकारी संघटनेचे कार्याध्यक्ष एम. अरगडे, कृषी पर्यवेक्षक संघटनेचे उपाध्यक्ष पी. ए. गुठ्ठे, कृषी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस. एस. साळवे, कृषी पर्यवेक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष व्ही. एस. सावके यांचा समावेश होता.