कृषी विभागाला लागणार बेमुदत ‘टाळे’

By Admin | Updated: August 12, 2014 23:25 IST2014-08-12T23:25:43+5:302014-08-12T23:25:43+5:30

कर्मचारी व अधिकारी संपावर

Agricultural Department | कृषी विभागाला लागणार बेमुदत ‘टाळे’

कृषी विभागाला लागणार बेमुदत ‘टाळे’

वाशिम : तांत्रीक संवर्गातील वेतणश्रेणी व दर्जावाढीसह विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचारी १४ ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. परिणामी, कार्यालयांना टाळे लागणार असुन याचा फटका शेतकर्‍यांना सोसावा लागण्याची शक्यता आहे. दरम्यान ११ ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले सदर कर्मचारी व अधिकार्‍यांचे धरणे सलग दुसर्‍या दिवशीही सुरूच होत कृषी विभागातील कर्मचारी व अधिकार्‍यांना तांत्रीक संवर्गातील वेतनश्रेणी देण्यात यावी, आहेत. आपत्कालीन परिस्थीतीत शेतीपिकाचे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यासाठी कृषी व सहकार विभागाचा शासन निर्णय १६ जूलै १९८३ अन्वये निर्धारित केलेल्या कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्यात यावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी कृषी विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

Web Title: Agricultural Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.