शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी संताप मोर्चा

By Admin | Updated: August 12, 2014 23:37 IST2014-08-12T23:37:54+5:302014-08-12T23:37:54+5:30

अभुतपुर्व मोर्चात हजारो मनसे सैनिकांनी लावली हजेरी

Agitated Front Against Farmers | शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी संताप मोर्चा

शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी संताप मोर्चा

मालेगाव : मागील वर्षी खरिप हंगाम अतवृष्टीमुळे व रब्बी हंगाम गारपीटीमुळे शेतकर्‍यांच्या हातून गेला. यावर्षी सुध्दा पावसाने पाठ फिरवली अशातच शासन सुध्दा शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे १२ ऑगस्ट रोजी संताप मोर्चा काढण्यात आला. मंगळवार १२ ऑगस्ट रोजी मनसेतर्फे संताप मोर्चा काढण्यात आला होता. त्यासाठी संपूर्ण तालुक्यातून हजारो मनसे सैनिकांनी हजेरी लावली होती. शेलु फाटयावर मनसे कार्यालयावर यात्रेचे स्वरुप आले होते. १५0 गाडयातून आलेले मनसे सैनिक मनसे कार्यालयातून जुने बसस्टॅन्डवर ते गांधी चौक मार्गे विर लहुजी पुतळयावरुन तहसील कार्यालयावर पोहोचले. मनसे जिल्हाध्यक्ष राजु पाटील राजे तालुकाध्यक्ष अशोकराव अंभोरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये हजारो मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. तहसीलदार काळे यांना यावेळी निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये शेतकरी हिताच्या विविध मागण्यांचा समावेश होता. त्यामध्ये सोयाबिनच्या संपूर्ण पिकांना व लाभ धारक शेतकर्‍यांना पिक विमा देयात यावा दुबार तीबार पेरणीचे सर्व्हेक्षण करुन प्रति हेक्टरी ५0 हजार रुपयांची मदत शेतकर्‍यांना द्यावी. शेतकर्‍यांचे सरसकट कर्ज माफ कररुन नविन पीक कर्ज माफ करावे. संपूर्ण मालेगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा.शेतकर्‍यांसाठी आवश्यक त्या ठिकाणी चारा डेपो सुरु करावे. शेतकर्‍यांचे वीज बिल माफ करुन त्यांना आवश्यकतेनूसार तातडीने वीज जोडणी द्यावी. आदी मागण्या या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या. या मोर्चामध्ये जिल्हाध्यक्ष राजु पाटील राजे, तालुकाध्यक्ष अशोक अंभोरे, जिल्हा उपाध्यक्ष विश्‍वनाथ सानप, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर जाधव, सचिव रंजित पाटील, अनिल बळी, जि.प.सदस्य चंदू जाधव, तालुका सचिव गणेश कुटे, अमोल देशमाने, गण्ेोश ठाकुर, रंगराव पाटील, कैलास राऊत, कैलास चोपडे, माधव जाधव, डॉ.काठोळे, रंजित घुगे, सोनु बळी, अमोल लासकर, पारिसनाथ लांडकर, कैलास जगताप, हरिभाऊ देशमुख, वसंतराव आंधळे, अनिल कुटे, गोपाल इंगळे, पींटू इंगळे, महिला तालुका प्रमुख संगिता कुटे, डॉ.कविता गायकवाड, शिला घुगे, सिताबाई धंधरे, आदींसह हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.

Web Title: Agitated Front Against Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.