शेतीच्या वादातून वृद्ध इसमाचा खून

By Admin | Updated: July 21, 2014 23:23 IST2014-07-21T23:23:46+5:302014-07-21T23:23:46+5:30

चारचाकी वाहनाने धडक मारून ठार केल्याप्रकरणी मंगरूळपीर पोलीसांनी आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Aged blood of the elderly | शेतीच्या वादातून वृद्ध इसमाचा खून

शेतीच्या वादातून वृद्ध इसमाचा खून

मंगरूळपीर : ६0 वर्षीय वृद्धास चारचाकी वाहनाने धडक मारून ठार केल्याप्रकरणी मंगरूळपीर पोलीसांनी आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. २0 जुलै रोजी तालुक्याकतील शिवणी रोड येथे घडलेल्या या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे. या घटनेसंदर्भात फिर्यादी कुसूमबाई तुळशीराम खडसे रा.पोटी या महिलेने मंगरुळपीर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादीचा आरोपी रवींद्र बबन चव्हाण, नरेन्द्र चव्हाण, त्याचे दोन सख्खे भाऊ व तीन सावत्र भाऊ तसेच विजय चव्हाण यांच्यासोबत शेतीबाबत वाद असून २0 रोजी रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास शिवणी शेतशिवारात आरोपींनी बेकायदेशीर जमाव करुन फिर्यादीचा पती माजी सैनिक तुळशीराम खडसे यास स्कॉर्पिओ गाडीने ठोस मारून ठार मारले. तसेच फिर्यादीच्या भावास लोखंडी पाईपने मारहाण केली व जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरूद्ध कलम १४७, १४८, १४९, ३0२, ३२३ सह कलम ३१, १0 अँट्रासिटी अँक्ट अन्वये गुन्हा दाखल केला असून एका आरोपीस अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय वाळके,पोलिस निरीक्षक शेख रऊफ यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

Web Title: Aged blood of the elderly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.