शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

खासदार-आमदार वादानंतर आता कार्यकर्ते आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 11:55 AM

MP-MLA dispute News आता पदाधिकारी व कार्यकर्ते आमने-सामने येत असल्याचे दिसून येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम :  प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी राेजी खासदार-आमदारांमध्ये वाद हाेऊन राजकारण चांगलेच तापल्यानंतर आता पदाधिकारी व कार्यकर्ते आमने-सामने येत असल्याचे दिसून येत आहेत. या संदर्भात वाशिम शहर पाेलिसांमध्ये तक्रारीसुद्धा दाखल करण्यात आल्या आहेत. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी व भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी नियाेजन भवनामध्ये २६ जानेवारी राेजी झालेल्या सभेनंतर चांगलाच वाद झाला. दाेन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यासाेबत काय घडले हे मांडले. या सर्व घडामाेडी आटाेपल्यानंतर वाद संपुष्टात आला असे वाटत असतानाच भाजप व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धमकी दिल्याच्या, घरासमाेर येऊन धिंगाणा घातल्यासह इतर तक्रारी दाखल केल्याने हा वाद संपुष्टात येईल, असे तरी सद्य:स्थितीवरून दिसून येत नाही. खासदार-आमदार वाद झाल्यानंतर वाशिम शहरात तणाव निर्माण झाला हाेता. त्यानंतर भाजपाच्या वतीने तालुकास्तरावर बंद पुकारला. दाेन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले म्हणणे मांडले. या घडामाेडीनंतर मात्र ‘भाजयुमाे’चे प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे यांनी वाशिम शहर पाेलिसांत तक्रार दिली की, २८ जानेवारी राेजी घरी जात असताना एक चारचाकी वाहन व त्यामागे १२ ते १३ माेटारसायकलींवर २० ते २५ जणांनी माझ्या घरासमाेर येऊन वाहनांचे हाॅर्न वाजविले व निघून गेले, पुन्हा परत येऊन घरासमाेर असलेल्या शिवाजी गायकवाड व माझा नाेकर शंकर खंदारे, वाहनचालक संदीप नंदापुरे यांच्या उपस्थितीत रवी भांदुर्गे, रविभैय्या पवार यांनी शिवाजी गायकवाड यांच्याकडे पाहत किती दिवस तुमच्या बंगल्यासमाेर पाेलीस राहणार आहेत? यासह इतर वक्तव्य करून निघून गेले. अप्रत्यक्षरीत्या मला धमक्या मिळत असल्याचे राजे यांनी तक्रारीत म्हटले आहे.  तसेच  हरीश गाेवर्धन सारडा यांनीही पाेलिसांत तक्रार दिली असून मी अनेक प्रकरणे उघडकीस आणल्याने माझ्या जीवितास धाेका असून पाेलीस संरक्षणाची त्यांनी मागणी केली आहे. या तक्रारीत त्यांनी  गजानन नागाेराव ठेंगळे,  सईद खान शेरगुल खान (रा. परभणी), महादेव ठाकरे (रा. मांगुळ झनक), अरुण मगर (रा. रिसाेड), लक्ष्मण महादजी इंगाेले (रा. वाशिम) यांच्या नावांचा उल्लेख केला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनीही राजू पाटील राजे यांच्याविराेधात तक्रार दाखल केली की, राजे यांनी आक्षेपार्ह विधान करून त्याची चित्रफीत बनवून ती समाजमाध्यमांवर प्रसारित केली. यामुळे खा. गवळी यांची बदनामी झाली आहे. तसेच राजे यांनी खासदारांना धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.गजानन ठेंगडे रा.गोंदेश्वर यांनी हरीषकुमार गोवर्धन सारडा यांनी २८ जानेवारी रोजी दुपारी फेसबुकवर त्याच्या स्वत:च्या अकांउटवरून एक पोष्ट व्हायरल केली असून खासदार भावना गवळी यांच्या वाशिम येथील जनशिक्षण कार्यालयात आपणास जीवे मारण्याबाबतचा कट रचल्याचे म्हटले आहे.अशा प्रकारचे काहीही घडले नसून खासदार भावना गवळी यांची बदनामी व्हावी या उद्देशाने सारडा यांनी ही पोष्ट केली आहे. खासदार भावना गवळी यांच्या विरोधात  बदनामीकारक पोस्ट व्हायरल करून समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी त्वरित चौकशी करून दोषीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी ठेंगळे यांनी केली.

घटनेच्या व्हिडीओची साेशल मीडियावर चर्चाखासदार-आमदारांच्या २६ जानेवारी राेजी घडलेल्या वादाचा व्हिडीओ साेशल मीडियावर व्हायरल हाेत असून यावर चांगलीच चर्चा रंगताना दिसून येत आहे. 

वाशिमच्या नगराध्यक्षांकडेही बाेट  गुठेवारीचा कायदा रद्द केल्यानंतरही वाशिम नगरपालिकेतर्फे यावर काेणताही निर्णय न घेता गुंठेवारीचा कायदा कायम ठेवला असल्याचे बाेट आमदार राजेंद्र पाटणी यांनी नगराध्यक्षाकडे दाखविल्याने या प्रकरणास आता नवे वळण मिळत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :washimवाशिमPoliticsराजकारणBhavna Gavliभावना गवळीRajendra Patniराजेंद्र पाटणीBJPभाजपाShiv Senaशिवसेना