खासदार-आमदार वादानंतर आता कार्यकर्ते आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 11:55 AM2021-01-30T11:55:24+5:302021-01-30T11:55:33+5:30

MP-MLA dispute News आता पदाधिकारी व कार्यकर्ते आमने-सामने येत असल्याचे दिसून येत आहेत.

After the MP-MLA dispute, now the workers are face to face | खासदार-आमदार वादानंतर आता कार्यकर्ते आमने-सामने

खासदार-आमदार वादानंतर आता कार्यकर्ते आमने-सामने

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम :  प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी राेजी खासदार-आमदारांमध्ये वाद हाेऊन राजकारण चांगलेच तापल्यानंतर आता पदाधिकारी व कार्यकर्ते आमने-सामने येत असल्याचे दिसून येत आहेत. या संदर्भात वाशिम शहर पाेलिसांमध्ये तक्रारीसुद्धा दाखल करण्यात आल्या आहेत. 
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी व भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी नियाेजन भवनामध्ये २६ जानेवारी राेजी झालेल्या सभेनंतर चांगलाच वाद झाला. दाेन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यासाेबत काय घडले हे मांडले. या सर्व घडामाेडी आटाेपल्यानंतर वाद संपुष्टात आला असे वाटत असतानाच भाजप व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धमकी दिल्याच्या, घरासमाेर येऊन धिंगाणा घातल्यासह इतर तक्रारी दाखल केल्याने हा वाद संपुष्टात येईल, असे तरी सद्य:स्थितीवरून दिसून येत नाही. खासदार-आमदार वाद झाल्यानंतर वाशिम शहरात तणाव निर्माण झाला हाेता. त्यानंतर भाजपाच्या वतीने तालुकास्तरावर बंद पुकारला. दाेन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले म्हणणे मांडले. या घडामाेडीनंतर मात्र ‘भाजयुमाे’चे प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे यांनी वाशिम शहर पाेलिसांत तक्रार दिली की, २८ जानेवारी राेजी घरी जात असताना एक चारचाकी वाहन व त्यामागे १२ ते १३ माेटारसायकलींवर २० ते २५ जणांनी माझ्या घरासमाेर येऊन वाहनांचे हाॅर्न वाजविले व निघून गेले, पुन्हा परत येऊन घरासमाेर असलेल्या शिवाजी गायकवाड व माझा नाेकर शंकर खंदारे, वाहनचालक संदीप नंदापुरे यांच्या उपस्थितीत रवी भांदुर्गे, रविभैय्या पवार यांनी शिवाजी गायकवाड यांच्याकडे पाहत किती दिवस तुमच्या बंगल्यासमाेर पाेलीस राहणार आहेत? यासह इतर वक्तव्य करून निघून गेले. अप्रत्यक्षरीत्या मला धमक्या मिळत असल्याचे राजे यांनी तक्रारीत म्हटले आहे.  
तसेच  हरीश गाेवर्धन सारडा यांनीही पाेलिसांत तक्रार दिली असून मी अनेक प्रकरणे उघडकीस आणल्याने माझ्या जीवितास धाेका असून पाेलीस संरक्षणाची त्यांनी मागणी केली आहे. या तक्रारीत त्यांनी  गजानन नागाेराव ठेंगळे,  सईद खान शेरगुल खान (रा. परभणी), महादेव ठाकरे (रा. मांगुळ झनक), अरुण मगर (रा. रिसाेड), लक्ष्मण महादजी इंगाेले (रा. वाशिम) यांच्या नावांचा उल्लेख केला आहे. 
शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनीही राजू पाटील राजे यांच्याविराेधात तक्रार दाखल केली की, राजे यांनी आक्षेपार्ह विधान करून त्याची चित्रफीत बनवून ती समाजमाध्यमांवर प्रसारित केली. यामुळे खा. गवळी यांची बदनामी झाली आहे. तसेच राजे यांनी खासदारांना धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
गजानन ठेंगडे रा.गोंदेश्वर यांनी हरीषकुमार गोवर्धन सारडा यांनी २८ जानेवारी रोजी दुपारी फेसबुकवर त्याच्या स्वत:च्या अकांउटवरून एक पोष्ट व्हायरल केली असून खासदार भावना गवळी यांच्या वाशिम येथील जनशिक्षण कार्यालयात आपणास जीवे मारण्याबाबतचा कट रचल्याचे म्हटले आहे.अशा प्रकारचे काहीही घडले नसून खासदार भावना गवळी यांची बदनामी व्हावी या उद्देशाने सारडा यांनी ही पोष्ट केली आहे. खासदार भावना गवळी यांच्या विरोधात  बदनामीकारक पोस्ट व्हायरल करून समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी त्वरित चौकशी करून दोषीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी ठेंगळे यांनी केली.


घटनेच्या व्हिडीओची साेशल मीडियावर चर्चा
खासदार-आमदारांच्या २६ जानेवारी राेजी घडलेल्या वादाचा व्हिडीओ साेशल मीडियावर व्हायरल हाेत असून यावर चांगलीच चर्चा रंगताना दिसून येत आहे. 


वाशिमच्या नगराध्यक्षांकडेही बाेट  
गुठेवारीचा कायदा रद्द केल्यानंतरही वाशिम नगरपालिकेतर्फे यावर काेणताही निर्णय न घेता गुंठेवारीचा कायदा कायम ठेवला असल्याचे बाेट आमदार राजेंद्र पाटणी यांनी नगराध्यक्षाकडे दाखविल्याने या प्रकरणास आता नवे वळण मिळत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: After the MP-MLA dispute, now the workers are face to face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.