शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

आयटी, सिव्हिल कोर्सनंतर नोकरी? अभियांत्रिकी पदविकेला पसंती; वाशिमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू

By दिनेश पठाडे | Updated: May 31, 2024 17:38 IST

याठिकाणी ३६० ची प्रवेश क्षमता असून शैक्षणिक वर्षे २०२४-२५ मधील प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला आहे. 

दिनेश पठाडे,वाशिम : जिल्ह्यात वाशिम येथे एकमेव शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय कार्यान्वित आहे. याठिकाणी ३६० ची प्रवेश क्षमता असून शैक्षणिक वर्षे २०२४-२५ मधील प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला आहे. 

इयत्ता दहावीचा निकाल २७ मे रोजी जाहीर झाला. त्यानंतर इयत्ता ११ वी व तत्सम अभ्यासक्रमास प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. वाशिम येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रीकल,  इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन,ऑटोमोबाइल, मॅकेनिकल आणि सिव्हिल हे कोर्स उपलब्ध आहेत. या सर्वच कोर्सला विद्यार्थ्यांची पसंती मिळत असल्याचे मागील काही वर्षांपासून पहावयास मिळत आहे. त्यामुळे दरवर्षी सर्व जागा भरुन अतिरिक्त जागांवर देखील प्रवेश देण्यात आले.  अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर  झटपट नोकरी मिळत असल्याने विद्यार्थी अलीकडच्या काळात पॉलिटेक्निककडे वळले आहेत. यंदाही विद्यार्थ्यांचा कल पॉलिटेक्निककडे वाढला आहे. पहिल्या दिवसांपासूनच प्रवेश अर्ज घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी कॅम्पसमध्ये येत आहेत.

क्षमता ३६० जगांची-

वाशिम स्थित असलेल्या शासकीय पॉलीटेक्निकमध्ये एकूण ३६० जागांची प्रवेश क्षमता आहे. त्यासाठी प्रवेश अर्ज  प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील कालावधीत वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये  प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. 

तंत्रनिकेतनमध्ये समुपदेशन कक्ष-

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये असलेल्या सहा कोर्सला विद्यार्थ्यांची पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासंबंधित अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे आदींची सर्वकष माहिती व्हावे, या उद्देशाने तंत्रनिकेतनमध्ये समुपदेशन कक्ष कार्यान्वीत करण्यात आला आहे. तेथील कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.

कोणत्या कोर्सला किती जागा-

१) माहिती तंत्रज्ञान ६९

२) सिव्हील ६९

३) इलेक्ट्रीकल ६९

४) इलेक्ट्रानिक ६९

४) ऑटोमोबाइल ६८

५) मेकॅनिकल ६७

टॅग्स :washimवाशिम