शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतचे प्रशासक झाले  नाममात्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 17:54 IST

Grmapanchayat News नियुक्त करण्यात आलेले प्रशासक केवळ नावापुरतेच असल्याचे ग्रामस्थांमध्ये बाेलल्या जात आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कमानाेरा  :  मानोरा  तालुकयातील २२ ग्रामपंचायतची मुदत संपल्यामुळे त्यावर प्रशासक म्हणून शासकिय कर्मचाऱ्यांची नेमणुक करण्यात आली आहे. परंतु हे प्रशासक ग्रामपंचायतीला साधी भेट सुध्दा देत नाहीत, गावाच्या विकासाचा विषय तर दूरच. ग्रामपंचायतचे नियुक्त करण्यात आलेले प्रशासक केवळ नावापुरतेच असल्याचे ग्रामस्थांमध्ये बाेलल्या जात आहे.तालुक्यातील २२ ग्रामपंचायतच्या मूदती संपल्याने पुन्हा सरपंचाना मूदतवाढ न देता ग्रामपंचायतीवर शासनाच्या आदेशान्वये प्रशासक म्हणून शासकिय कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले. यामध्ये प्रशासक म्हणून  केन्दप्रमुख , मुख्याध्यापक यांच्यासह अनेक विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे . परंतु प्रशासक नेमल्यापासून अनेक ठिकाणी गाव विकासासंदभार्त ना गावात भेटी ना एकही बैठक घेण्यात आली. प्रशासक ग्रामपंचायत सदस्यांपेक्षा चांगले कामे करतील, ते काेणत्याही पक्षाचे नसल्याने सर्वांना समान न्याय मिळेल, गावाचा विकास हाेईल असे परिसरातील गावकऱ्यांना वाटले हाेते, परंतु तसे झालेले दिसून येत नाही. प्रशासकांची नेमणुका तर करण्यात आलयात, परंतु त्यांच्याकडे असलेले इतर कामेही त्यांच्याकडे असल्याने गावविकासाकडे त्यांचे दुर्लक्ष हाेत असल्याचे गावकऱ्यांमध्ये बाेलल्या जात आहे. यामुळे अनेक गावाची कामे रखडली . साधी दैनंदिन कामे सुध्दा होत नाही , त्यामुळे ग्रामपंचायत अस्तित्वात आहे कि नाही  असा प्रश्न पडला आहे.  प्रशासकाने दररोज किमान दोन तास तरी  गावासाठी द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडुन होत आहे  .ग्रामपंचायतीची मुदत संपल्यामुळे नियुक्त करण्यात आलेले प्रशासकांकडून ग्रामस्थांना गाव विकासाची अपेक्षा हाेती, परंतु प्रशासक गावात येऊनही पाहत नसल्याने ग्रामपंचायत निवडणुकांची प्रतिक्षा ग्रामस्थ करताना दिसून येत आहेत. 

प्रशासक व ग्रामसेवकांनी गाव विकास  व दैनंदिन कामे यासाठी नागरीकाना विश्वासात घेऊन कामे करणे अपेक्षीत आहे. - संजय भगत,  विस्तार अधिकारी (पंचायत ) मानोरा

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतManoraमानोरा