प्रशासकीय यंत्रणा शेतकऱ्यांच्या पाठीशी - शैलेश हिंगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 06:40 PM2019-11-02T18:40:36+5:302019-11-02T18:40:49+5:30

निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्याशी साधलेला हा संवाद...

The administrative system is backed by farmers - Shailesh Hinge | प्रशासकीय यंत्रणा शेतकऱ्यांच्या पाठीशी - शैलेश हिंगे

प्रशासकीय यंत्रणा शेतकऱ्यांच्या पाठीशी - शैलेश हिंगे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अवकाळी पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे हजारो शेतकरी संकटात सापडले आहेत. सोयाबिन, तूर, उडिद, कपाशी या पारंपरिक पिकांसह फुल व फळपिके नेस्तनाबूत झाली. या अस्मानी, सुलतानी संकटप्रसंगी शेतकºयांना प्रशासनाच्या भरीव सहकार्याची अपेक्षा आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासन शेतकºयांच्या पाठिशी असून पीक नुकसानाचे पंचनामे चोखपणे पार पाडून शेतकºयांना नियमानुसार मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली. यासंदर्भात त्यांच्याशी साधलेला हा संवाद...

पिकांच्या नुकसानामुळे शेतकरी संकटात सापडले, याबाबत प्रशासनाच्या भुमिकेविषयी काय सांगाल? 
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकºयांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाच्या निर्देशावरून २७ आॅक्टोबरपासूनच पिक नुकसानाचे पंचनामे करण्याची प्रक्रिया अवलंबिण्यात आली आहे. प्रशासकीय यंत्रणेतील सर्व अधिकाºयांनाही शेतकºयांच्या बांधापर्यंत पोहचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे कृषी अधिकारी कार्यालय व बँकांमध्ये शेतकºयांचे तक्रार अर्ज स्विकारण्यात आले असून शासकीय नियमानुसार शेतकºयांना मदत पुरविली जाणार आहे.

पीक विमा घेतलेल्या शेतकºयांनाच मिळणार का नुकसानभरपाई ?
चालूवर्षीच्या खरीप हंगामात १ लाख ३० हजार ७५६ कर्जदार व बिगर कर्जदार शेतकºयांनी पिकांचा विमा उतरविला आहे. २ नोव्हेंबरपर्यंत १ लाख ७ हजार ९६१ शेतकºयांनी पीक विम्यापोटी नुकसानभरपाई मिळण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण, पंचनामे करण्याची प्रक्रिया पूर्ण करून तसे अहवाल शासनाकडे पाठविले जाणार आहेत. पीक विमा घेतलेले नव्हे; तर नुकसानग्रस्त सर्व शेतकºयांच्या शेतीचे पंचनामे केले जात आहेत. 

सर्वेक्षण आणि पंचनामे करताना पावसामुळे अडचण जात आहे काय?
जिल्ह्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये अवकाळी पावसाने पिकांची प्रचंड हानी झाली आहे. अनेक ठिकाणी सोंगल्यानंतर सुड्या रचून ठेवलेल्या सोयाबिनला कोंब फुटले असून काहीठिकाणी उभी असलेली ज्वारी आणि कपाशी या पिकांचीही अशीच गंभीर अवस्था झालेली आहे. दरम्यान, प्रशासकीय यंत्रणा चिखल तुडवत तथा पाऊस सुरू असतानाही पंचनामे करित आहे.

Web Title: The administrative system is backed by farmers - Shailesh Hinge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.