प्रशासकीय कार्यालयांमधील स्वच्छतागृहे अस्वच्छतेच्या विळख्यात!

By Admin | Updated: April 11, 2017 20:13 IST2017-04-11T20:13:37+5:302017-04-11T20:13:37+5:30

वाशिम- प्रशासकीय कार्यालयांमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवण्यासोबतच स्वच्छतागृहे देखील अस्वच्छतेच्या विळख्यात अडकली आहेत.

In the administrative offices, the clean-up of sanitary latrines! | प्रशासकीय कार्यालयांमधील स्वच्छतागृहे अस्वच्छतेच्या विळख्यात!

प्रशासकीय कार्यालयांमधील स्वच्छतागृहे अस्वच्छतेच्या विळख्यात!

वाशिम : जिल्हा मुख्यालय असलेल्या वाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेसह इतर अनेक प्रशासकीय कार्यालयांमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवण्यासोबतच स्वच्छतागृहे देखील अस्वच्छतेच्या विळख्यात अडकली आहेत. 
वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दोनठिकाणी कुपनलिका घेण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्या फेब्रुवारीमध्येच कोरड्या पडतात. परिणामी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. ही परिस्थिती यंदाही कायम असून स्वच्छतागृहांमध्येही वापरावयास पाणी नसल्याने त्यात घाणच घाण पसरत आहे. जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचीही अशीच अवस्था झालेली आहे. यामुळे कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबतच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होत आहे. 

Web Title: In the administrative offices, the clean-up of sanitary latrines!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.