मानोरा नगरपंचायतचा कारभार ढेपाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:48 IST2021-09-14T04:48:25+5:302021-09-14T04:48:25+5:30
मानोरा येथील स्थानिक कर्मचाऱ्यांची बदली करून नवीन लोकांना पाचारण केल्याशिवाय सुधारणा होणार नाही. गलिच्छ वस्ती सुधार योजना बंद आहे. ...

मानोरा नगरपंचायतचा कारभार ढेपाळला
मानोरा येथील स्थानिक कर्मचाऱ्यांची बदली करून नवीन लोकांना पाचारण केल्याशिवाय सुधारणा होणार नाही. गलिच्छ वस्ती सुधार योजना बंद आहे. स्वछता अभियान राबविले जात नाही. सर्वत्र घाण पसरली आहे. नाल्या तुंबल्या आहेत. अनेक रस्ते नादुरुस्त आहेत. पथदिवे बंद आहेत. मात्र, करवसुली सुरू आहे. तहसील कार्यालयात परिसरातदेखील दिवे लावले नाहीत. मानोरा हे तालुक्याचे ठिकाण असून, १३० गावे जोडलेली आहेत. बुधवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात सोयीसुविधा नाहीत. सर्वत्र पाणी, चिखल साचलेला असतो. बाजार कर म्हणून प्रत्येक दुकानातून रुपये २०, ३० दर आठवड्याला वसूल करण्यात येतो. वार्षिक १० लाख वसुली अपेक्षित आहे. मात्र, नगरपंचायतकडून बाजारातील ओटे दुरुस्त करून दिले जात नाहीत, तर बाजारातील रस्त्यावर मुरूम, माती टाकून चिखलमुक्त केले जात नाही, असा आरोप देवराव राठोड बंजारा यांनी केला आहे.